*जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचीत संचालक आमदार.श्री.बळवंतराव वानखडे यांची श्री क्षेत्र नागरवाडी येथे सदिच्छा भेट.*

0
618
Google search engine
Google search engine

 

वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबांचे अंतिम श्रध्दास्थान असलेले श्री क्षेत्र नागरवाडी, येथे गोर- गरीबांचे कैवारी आमदार श्री.बळवंतराव वानखडे यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी, श्री गाडगेबाबांच्या परम आशीर्वादाने निवड झाली व भरभरुन यश प्राप्त झाले.या करीता मा.आ.श्री.बळवंतराव वानखडे यांनी श्री क्षेत्र नागरवाडी येथे आपली सदिच्छा भेट दिली.तसेच या प्रसंगी नवनिर्वाचीत संचालक श्री.बळवंतराव वानखडे यांच्या शुभहस्ते श्री गाडगेबाबांच्या मुर्तीचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करत श्री. बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन कृपा आशीर्वाद देखील घेतले,तसेच या आनंदमय प्रसंगी मा.आमदार श्री.बळवंतराव वानखडे व कौशल्यादेवी मालपाणी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्री.रामेश्वर जगन्नाथ मालपाणी. व श्री.गजाननराव देशमुख यांचे संस्थेचे संचालक श्री.बापुसाहेब देशमुख यांनी शाल, श्रीफळ, देवुन स्वागत केले. तसेच श्री गाडगेबाबांनी आपल्या अखेरच्या क्षणी त्यांच्या सेवकाकडून लिहलेल्या पत्रात “जे जे होईल ते ते करा वसान नागरवाडीचे इंद्रभुवन करा” या संदेशानुसार मा.संचालक श्री.बापुसाहेब देशमुख यांच्या ने़तृत्वात नागरवाडी खऱ्या अर्थाने इंद्रभुवनाकडे वाटचाल करत आहे,असे गौरवोद्गार आ.श्री.बळवंतराव वानखडे यांनी व्यक्त केले.त्याचबरोबर शालेय परिसराची पाहणी करीत असतांना आश्रमशाळेतील गोरगरीब आदिवासींचे मुले बुध्दीबळासारख्या खेळात विशेष पारंगत व्हावे याकरीता अकोला येथिल उदार दयाळु श्री.सुखदेवशेठ भुतडा यांनी सर्व भौतिक सोयीसुविधायुक्त असे प्रशस्त स्वरुपाचे बुध्दीबळ सभागृह बांधुन दिले.तसेच सभागृहालगतच असणारे अशोकाचे झाडे न तोडता बुध्दीबळ सभागृहाची आकर्षक अशी नाविन्यपूर्ण वास्तुरचना करणारे अभियंता श्री.मनिषभाऊ भुतडा यांचे आमदार श्री.बळंतराव वानखडे यांनी विशेषत: कौतुक केले.तसेच श्री गाडगेबाबांच्या संदेशानुसार श्री गाडगे महाराज संस्था नागरवाडी अनेक सेवाभावी उपक्रमासोबतच शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रम राबवित आहे.त्याचबरोबर श्री गाडगेबाबांचे अंतिम श्रध्दास्थान व शासन सन्मानीत तिर्थक्षेत्र,पर्यटनक्षेत्राला दुरवरुन भाविक भक्त भेट देण्याकरीता येतात व नागरवाडी इंद्रभुवनातील निसर्गरम्य अशा आनंदमय वातावरणाचा खऱ्या अर्थाने आनंद देखील घेतात.