अभ्यासिका व ई- ग्रंथालयासाठी प्रवेशाला सुरूवात • अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचा उपक्रम

0
433
Google search engine
Google search engine

अमरावती :-

अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघद्वारा संचालित अभ्यासिका तथा ई- ग्रंथालयाच्या प्रवेश प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली आहे. शहरात शिक्षण घेणाऱ्या व प्रामुख्याने स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरूणांना मुबलक दरात अभ्यासिका तसेच ई- ग्रंथालयाचा लाभ मिळावा या अनुषंगाने पत्रकार संघाने हा उपक्रम सुरू केला असून त्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मराठी पत्रकार भवन, वॉलकट कंपाऊंड येथे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
अमरावती शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या वॉलकट कंपाऊंड नजिक मराठी पत्रकार भवन येथे राज्य शासनाच्या सहकार्याने तसेच अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या संकल्पनेतून एक अत्याधुनिक अभ्यासिका निर्माण करण्यात आलेली असून १ नोव्हेंबरपासून ती सुरू होणार आहे. या अभ्यासिकेचे उद्धाटन माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते पार पडले आहे. शहरात शिक्षण घेणाऱ्या तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरूणांना अत्यल्प दरात अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या सोई उपलब्ध करून दिल्या आहेत.
शहरात अत्यल्प दरात अभ्यासिकेची सुविधा अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाने उपलब्ध करून दिलेली असून त्या ठिकाणी सुसज्ज बैठक व्यवस्था, गार व शुद्ध पेयजल, स्वच्छतागृह अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या अभ्यासिकेत प्रवेश घेण्यासाठी अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रफुल्ल घवळे ९३७०१०४२९३, अभ्यासिका समन्वयक तथा प्रसिद्धी प्रमुख गौरव इंगळे ९४०३३८७७५२, बबलू दोडके ९३७१२४७६७५ यांच्याशी संपर्क करावा तसेच प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी मराठी पत्रकार भवन वॉलकट कंपाऊंड अमरावती येथे मनिष डोंगरे यांच्याशी ९५४५८३२७१९ संपर्क करण्याचे आवाहन अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे.

वायफायसह डिजीटल लायब्ररीचाही लाभ
जिल्हा मराठी पत्रकार संघाने अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांच्या सोईस्तव मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून दिलेली असून त्यासोबतच त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या निवडक पुस्तकांचा लाभ देखील विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. तसेच डिजीटल लायब्ररीमधून नवनवीन आधुनिक पुस्तकांचा अॅक्सेस देखील मिळवून दिला जाणार असून त्यासाठी पत्रकार संघ अद्याप कार्यरत आहे.