श्री गाडगे महाराज संस्था श्री क्षेत्र नागरवाडी यांनी मेळघाट मधील गोरगरीब आदिवासी बांधवांन समवेत केली “चिचाटी येथे आनंदात दिवाळी” साजरी

0
538
Google search engine
Google search engine

Melghat:-

निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबांनी आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत “सेवा परमो धर्म” याप्रमाणे गोरगरीब जनता जनार्दनाची सेवा केली.श्री बाबांच्या कार्याला जपत श्री बाबांच्या प्रतिरुप सेवार्थ प्रचार वाहणातून खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा म्हणुन मा.संचालक श्री.बापुसाहेब देशमुख श्री गाडगे महाराज संस्था श्री क्षेत्र नागरवाडी व श्री गाडगे महाराज गोरक्षण संस्था मुर्तिजापुर यांचे वतीने मेळघाटसारख्या अतिदुर्गम डोंगरी भागातील, चिचाटी या गावातील गोरगरीब आदिवासी वनवासी बांधवांची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करण्यात आली.तसेच या दिपावली आनंद उत्सवाची सुरुवात चिचाटी येथिल लहान मुले,अंध,अपंग वृध्द मायबापांचे, सुंदर सुवासिक उटने लावुन अभ्यंग स्नान करत त्यांना नविन सुंदर कपडे परिधान करत श्री.मंगेशभाऊ देशमुख यांचे शुभहस्ते औक्षवन करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाला प्रमुख पाहुने म्हणुन लाभलेले तसेच श्री.मंगेशभाऊ देशमुख ( जिल्हा अध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना )श्री गाडगेबाबांच्या कार्याचा प्रचार प्रसार करणारे ह.भ.प.श्री.भरत महाराज रेळे. श्री बाबांचे परम भक्त श्री.दिपकदादा देशमुख विश्रोळीकर. श्री.महेश पाटील खारोडे. ( उपसभापती पंचायत समिती अंजनगाव सुर्जी ) यांचे शाल श्रीफळ देवून संस्थेतर्फे स्वागत करण्यात आले.त्याचबरोबर अभियंता श्री.योगेशजी देशमुख यांची मुलगी कु.ऋग्वेदा योगेशजी देशमुख यांचा वाढदिवस गोरगरीब आदिवासी बांधवांन सोबत साजरा करत एक चांगला आदर्श समाजासमोर ठेवला तसेच चिचाटी येथिल संपुर्ण आदिवासी बांधवांना वस्त्रदान अन्नदान करण्यात आले.
मुंबई येथील उदार दयाळू श्री संतोषकुमारजी झुनझनवाला व सौ.सितादेवी संतोषकुमारजी झुनझुनवाला. यांचे सौजन्याने महिलांना सुंदर नविन साड्या, पुरुषांना कपडे, ब्लॅंकेट, फटाके, तसेच चांदुरबाजार येथिल नामांकित शिवकृपा रेडीमेड तर्फे लहान मुलांना नविन ड्रेस.तसेच अमरावती येथिल श्री.प्रमोदभाऊ देशमुख यांचे कडून उबदार स्वरुपाचे सुंदर ब्लॅंकेट. मुर्तिजापर येथिल दानशूर श्री.सचिदानंद लक्ष्मीनारायण शेठ मालाणी यांचेकडून मिष्ठांन बुंदिचे लाडू तसेच श्री.सम्राटभाऊ डोंगरदिवे सभापती बांधकाम व शिक्षण विभाग जिल्हा परिषद अकोला यांचेकडून दिवाळी फराळ चिवडा, त्याचबरोबर श्री.चंद्रकांतजी उर्फ बाळासाहेब खिडके महाराष्ट मेडीकल अमरावती व स्व.बाबलाशेठ धंधुकिया यांचे स्मरणार्थ लहान मुलांना बिस्कीट,तसेच श्री.संजयजी राऊतकर सर यांचेकडून लहान मुलांना सुंदर चॉकलेट तसेच मुर्तिजापुर श्री.सचिनशेठ मालाणी यांनी या दिपावली उत्सवाकरीता रोख स्वरुपात मदत देखिल केली.प्रामुख्याने या अभिनव उपक्रमाकरीता मुंबई येथिल कर्करोग रुग्णसेवक, श्री.प्रशांतजी देशमुख सातत्याने मदत करतात.तसेच या आनंदमय प्रसंगी प्रामुख्याने गावकऱ्यांच्या वतिने पोलीस पाटील श्री.दिलीप दारसिंबे यांनी या दिपावली आनंद उत्सवाचे सर्वेसर्वा तसेच आपल संपुर्ण आयुष्य खऱ्या अर्थाने गोरगरीबांन करीता झिजवणारे श्री बाबांचे निष्कामसेवक श्री बापुसाहेब देशमुख यांचे स्वागत केले. यासोबतच श्री बापुसाहेबांनी गावकऱ्यांच्या समस्या देखिल जाणुन घेत समस्त गावकरी बांधवांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला. मेळघाटसारख्या अतिदुर्गम भगात देवदूत म्हणुन कार्य करणारे आदरणीय श्री बापुसाहेब यांच कार्य खरोखर अभिमानास्पद आहे. असे गौरवउद्गार श्री.धर्माळे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी प्रकल्प कार्यालय धारणी यांनी या प्रसंगी काढले. या कार्यक्रमाला श्री.गजाननराव जवंजाळ ( श्री बाबांच्या प्रचार वाहनाचे चालक ) श्री.प्रकाशभाऊ महात्मे. श्री.सागरभाऊ देशमुख.ह.भ.प.श्री.भरत महाराज रेळे श्री.हरिभाऊजी मोगरकर. श्री.विठ्ठलराव तेलमोरे.पशुवैद्य श्री.बाळासाहेब कावरे. श्री. के.आर. चौधरी सर.श्री.अतुलजी रेळे सर. क्रीडा शिक्षक संतोष मिसाळ श्री.राजाभाऊ जोशी.श्री.किशोरसिंह काकाजी.श्री.बंडूभाऊ मानकर.श्री.अमोल शेळके.श्री.सुनिल मोहोड.श्री.सोनु राऊत. तसेच,नागरवाडी येथिल श्री बाबांची सेवकमंडळी उपस्थित होती. त्याचबरोबर दिपावलीच्या या अभिनव अशा नाविन्यपुर्ण उपक्रमातून मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातील निसर्गरम्य अशा चिचाटी गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिवाळी साजरी केल्याचा आनंद दिसत होता.