शहरात संपूर्ण शांतता, प्रत्येक संवेदनशील ठिकाणी काटेकोर बंदोबस्त :- पोलीस आयुक्त डॉ. सिंह

0
2894
Google search engine
Google search engine

 

शहरात शांततापूर्ण स्थिती

सर्वत्र सलोखा राखण्याचे पालकमंत्री, प्रशासनाचे आवाहन

 

अमरावती, दि. 14 : शहरात सध्या शांततामय वातावरण असून, यापुढेही शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्यासह जिल्हा प्रशासनाने केले आहे.

शहरात अनुचित घटना रोखण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडून कालपासून शर्थीचे व अविश्रांत प्रयत्न होत असून, शहरात सर्वत्र शांतता निर्माण झाली आहे. त्यांनी काल स्वत: शहरात फिरून परिस्थितीची पाहणी केली व शांततेचे आवाहन केले. पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यासमवेत चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.

शहरात परिस्थिती शांत आहे. पोलीस बंदोबस्त सर्वत्र चोख आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात आहेत. विविध धर्मांचे नागरिक सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करत आहेत. सलोख्याचे वातावरण निर्माण होत आहे. यापुढेही असाच सलोखा व शांतता राखण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले.

शहरात काटेकोर बंदोबस्त

शहरात संपूर्ण शांतता आहे. प्रत्येक संवेदनशील ठिकाणी काटेकोर बंदोबस्त आहे. दोषींवर कारवाई होत आहे. दोन दिवस ज्या वेगवेगळ्या अनुचित घटना घडल्या, त्या सर्व घटनांतील दोन्ही गटांच्या जबाबदार दोषी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अद्यापपर्यंत 15 गुन्हे दाखल करण्यात आले. सुमारे 50 संशयितांना अटक करण्यात आली. याप्रकरणी तपास जारी असून, गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शहरात शांतता व सलोखा कायम राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. सिंह यांनी केले.

000