*राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या* *समाधीस्थळाला राज्यपालांचे अभिवादन*

340

 

*गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे*
*समाधीस्थळ व प्रार्थना मंदिराला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट*

*अमरावती, दि. 24 :* राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे शांतीस्थान महासमाधीला आज भेट दिली. यावेळी महासमाधीवर त्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच येथील प्रार्थना मंदिरालाही भेट दिली.
समाधीस्थळावरील शांतता व पावित्र्य मनाला संमोहित करणारे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महारांच्या विचारांनी ही भूमी पावन झालेली आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांची ज्योत प्रत्येकाने आपल्या मनात तेवत ठेवावी. हीच खरी त्यांना मानवंदना ठरेल, असे श्री कोश्यारी यावेळी म्हणाले.
महापौर चेतन गावंडे, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव जनार्दन बोधे, श्रीमती निवेदिता चौधरी, अध्यात्म विभाग प्रमुख डॉ राजाराम बोधे तसेच जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, तहसिलदार वैभव फरताडे, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ आदी यावेळी उपस्थित होते.
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळामार्फत राज्यपाल श्री कोश्यारी यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित गद्य-पद्य ग्रंथ संपदा, ग्रामगीता तसेच शाल, श्रीफळ देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.
00000

जाहिरात