*एक दिवस विसावा वृद्धाश्रमात* *सिनेट सदस्य डॉ.मनीष गवई यांची विसावा वृध्दाश्रमाला भेट* *वृध्दाश्रमाच्या अनुदानासाठी प्रयत्न करणार – डॉ.मनीष गवईचे आश्वासन*

0
560
Google search engine
Google search engine

 

*परतवाडा* – अमरावती विदयापिठ राज्यपाल नामित सिनेट सदस्य तथा केद्रीय सामाजि न्न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे खाजगी स्वीय सहायक अचलपुरचे सुपुत्र डॉ.मनीष गवई यांनी शुक्रवार दि.26 नोव्हेंबर 2021 रोजी अचलपुर येथील विसावा वृध्दाश्रमाला भेट दिली.
अचलपुर येथील जगदंबा महाविदयालय व दिक्षाभुमि येथे संविधान दिनानीमीत्य डॉ.मनीष गवई यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. गवई अचलपुरला आले होते. आपला व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत त्यांनी अचलपुर येथील विसावा वृध्दाश्रमाला भेट दिली. वृध्दाश्रमाच्या कार्याविषयी माहिती घेत, वृध्दांची संस्था घेत असलेली काळजी पाहुन त्यांनी संस्थेचे कौतुक केले. विसावा वृध्दाश्रमाचे संस्थापक सचिव adv. भास्कर कौतिक्कर डॉ.मनीष गवई व त्यांच्या पत्नी यांचे शाल व पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. यावेळी वृध्दाश्रमाच्या अनुदानासाठी शासनस्तरावर सहकार्य करणार असल्याचे डॉ. गवई यांनी आश्वासन दिले.