डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अकोला येथे उद्योजकता परिचय व कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न

0
316
Google search engine
Google search engine
  1. अकोलाःसमाज कल्याण आयुक्तालय,पुणे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे ( सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन ) अंतर्गत. डॉ..बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहा.मंत्री यांच्या सूचनेनुसार उद्योजकता परीचय व कौशल्य विकास या विषयावर आधारित प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन हे श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय अकोला येथे संपन्न झाले.

समाज कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मुख्य संकल्पनेनुसार अनु.जाती तसेच इतर मागासवर्गीय घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संबधित घटकांतील युवक युवतीचे स्वयं सहाय्यता युवा गट संपूर्ण महाराष्ट्रभर बार्टी च्या समतादूतांमार्फत स्थापन करण्यात येत आहेत.यामध्ये अकोला जिल्हात आतापर्यंत समतादूत टीम मार्फत एकूण १९१ स्वयं सहा.युवा गट स्थापन केले आहेत.
प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण सुनील वारे,उपायुक्त तथा बार्टी विभाग प्रमुख योजना उमेश सोनवणे,अकोला समाज कल्याण सहा.आयुक्त डॉ.अनिता राठोड,बार्टी चे प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापित ह्या युवा गटातील सभासदांसाठी उद्योजकता परिचय व कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाभर करण्यात येत आहे.
सदर आयोजनानुसार अकोला जिल्हातील नियोजित उद्घाटनपर प्रशिक्षण कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य केशव गोरे हे लाभले.तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.डॉ.रावसाहेब ठोके अध्यक्ष समाज कार्य अभ्यास मंडळ संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व बार्टी चे जिल्हा प्रकल्प अधिकारी तथा नोडल अधिकारी विजय बेदरकर यांची लाभली होती.प्रमुख मार्गदर्शक व्याख्याते म्हणून सुभाष इंगळे सचिव खादी ग्रामोद्योग मंडळ अकोला तसेच प्रभाकर चौधरी प्रकल्प अधिकारी ( महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ) यांची लाभली होती

.
यावेळी सर्वप्रथम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.सदर कार्यशाळेमध्ये स्वयं सहाय्यता युवा गटातील सभासद व समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग नोंदविला.सदर कार्यक्रम हा कमी उपस्थितीत कोविड – १९ च्या नियमांचे पालन करत संपन्न झाला असून कार्यक्रम स्थळी प्रकल्प अधिकारी यांनी उपस्थितांना मास्क चे वाटप केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हातील तालुकानिहाय कार्य करणारे समतादूत अँड.वैशाली गवई,रविना सोनकुसरे,विनोद शिरसाठ,उपेंद्र गावंडे,शुभांगी लव्हाळे,समता तायडे,मनेश चोटमल,प्रज्ञा खंडारे,स्मिता राऊत व ता.समन्वयक यशवंत खंडारे युगधंरा जढाळ तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.संचालन अजय विजय शेंगोकर तर आभार प्रदर्शन समतादूत विनोद शिरसाठ यांनी मानले.