अमरावती ब्रेकिंग :- दुर्दैवी घटना – लोखंडी शिडीला विद्युत तारांचा स्पर्श, शॉक लागून चौघांचा मृत्यू

0
10085
Google search engine
Google search engine

अमरावती : लोखंडी शिडीला ११ केव्हीच्या विद्युत तारांचा स्पर्श होऊन झालेल्या अपघातात चौघांचा ऑन द स्पॉट तडफडून मृत्यू झाला. कठोरा रोडस्थित पी. आर. पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टियुटसमोर असलेल्या मेन गेट समोर बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास ही हृद्यद्रावक घटना घडली. नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.अक्षय साहेबराव सावरकर (२६, रा. टाकळी जहांगिर), प्रशांत अरूण शेलोरकर (३१, शिराळा), संजय बबनराव दंडवाईक (४५, आदिवासी नगर, अमरावती) व गोकुल शालिकराम वाघ (२९, रा. टाकळी जहांगिर) अशी मृतांची नावे आहेत. चौघेही पी. आर. पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टियुटमध्ये कंत्राटी शिपाई होते, अशी नोंद नांदगाव पेठ पोलिसांनी घेतली आहे.