सत्ताधारी भाजपने विकास कामानेच केला शेवट

0
383
Google search engine
Google search engine

सत्ताधारी भाजपने विविध विकास कामे करीत शेवट गोड केला न प अंतर्गत ०१ कोटी ५७ लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण १३० महिलांना शिलाई मशीनचे वाटप करीत, शेगाव भाजपने न.प. माध्यमातून मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करून शहराचा विकासात्मक कायापालट करण्याचा सत्ताधारी भाजपने केला.

“सबाका साथ सबका विकास” या स्लोगन चा वारसा घेत
दिनांक ०३ जानेवारी रोजी नपच्या कार्यकाळ संपुष्टात येत असताना सुद्धा भाजपने विविध विकास कामे करीत शेवट गोड केला,त्या अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी एक कोटी 57 लक्ष रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले, आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शकुंतला बुच ह्या होत्या, यावेळी प्रमुख उपस्थित भाजप गटनेते शरद अग्रवाल, पांडुरंग बूच सभापती पवन महाराज शर्मा, उपाध्यक्ष सुषमा शेगोकार, नगरसेवक गजानन जवंजाळ, मला देशमुख, दिनेश शिंदे, प्रीती शेगोकार ,मंगला देशमुख,नगर सेविका खानजोडे ,सामजिक कार्यकर्ता बंडू राहणे, नगरसेवक शैलेन्द्र पटोकार, यांच्यासह भाजपचे नेते नितीन शेगोकार, कमलाकर चव्हाण, खंडारे भाजपचे माजी शहराध्यक्ष डॉक्टर मोहन बानोले शहराध्यक्ष ज्ञानेश्वर आप्पा साखरे, विजय यादव ,सचिन धमाळ ,राजू अग्रवाल ,यांची उपस्थिती होती.

सकाळी सर्वप्रथम प्रभाग ०१ मध्ये वेताळबाबा मंदिर परिसरात व संत सेनाजी महाराज चौकातील ओपन स्पेस चे भूमिपूजन करण्यात आले, प्रभाग ०२ मधील धनगर नगर स्थित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले, नंतर प्रभाग०७ मध्ये सरस्वती नगर परिसरात बगीच्या विकसित करून या बगिच्यात स्वर्गीय गुणवंतराव नामदेवराव पाटील, यांचे नाम नामकरण सोहळा पार पडला, खामगाव रोड वरील माळीसमाज भवनाच्या ओपन स्पेस चे सौंदर्यीकरणनाचे भूमिपूजन करण्यात आले,

भूत बंगला परिसरातील स्वर्गीय देविदास उपाध्याय मार्गाचे नामकरण करण्यात आले, सरतेशेवटी न.प.च्या संत तुकाराम महाराज अभ्यासिका च्या प्रांगणात महिला व बालकल्याण विभागामार्फत विधवा, घटस्फोटीत, परिपक्वता व गरजू महिलांना मान्यवरांच्या हस्ते १३० शिलाई मशीन चे वाटप करण्यात आले, सर्व स्तरावरील विकास कामे करीत या गरजू महिलांच्या चेहऱ्यावर आनंद होईल असे काम करत भाजपने आपला कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करीत शेवट गोड केला.

विकासात जनसेवेचे भाग्य लाभले याचे समाधान गटनेता शरद शेठ अग्रवाल यानी पाच वर्षांपूर्वी आमदार डॉक्टर कुटे यांच्या नेतृत्वात शहरवासीयांनी न. प. मध्ये एक हाती सत्ता दिली, या पाच वर्षात नगराध्यक्ष उपाध्यक्ष सर्व समितीचे सभापती सर्वच नगरसेवक सर्व राजकीय पक्षाचे सर्व नेते पत्रकार बंधु शहरातील गणमान्य व्यक्ती व सामान्य जनतेचे सहकार्यामुळेच संतनगरी च्या सर्वांगीण विकास केला गेला, शहरातील सर्वच प्रभागातील विकासात्मक जनसेवेचे भाग्य लाभले याचे मनोमन समाधान असल्याचे
अशी प्रतिक्रिया भाजप नेते शरद अग्रवाल यांनी दिली,