अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आज नव्याने 171 कोरोनाबाधित आढळून आले.

0
766
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 7 : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आज नव्याने 171 कोरोनाबाधित आढळून आले.

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात 51, अकोला येथे 65, यवतमाळ 32, बुलडाणा 16 व वाशिम येथे 7 असे एकूण 171 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आज रोजी बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 20 असून त्यात अमरावती 6, अकोला 9, यवतमाळ 2, बुलडाणा 3 असे आहेत.

आजपर्यंत ओमिक्रॉन व्हेरियंटचे 5 रुग्ण असून अमरावती येथे 2, अकोला 1 व बुलडाणा येथील 2 रुग्ण आहे.

आतापर्यंत बरे झालेले एकूण रुग्ण 3 लाख 52 हजार 63 असे आहेत : अमरावती 95 हजार 236, अकोला 57 हजार 149, यवतमाळ 71 हजार 194, बुलडाणा 86 हजार 994, वाशिम 41 हजार 490.

आजपर्यंत झालेले एकूण मृत रुग्ण एकुण 5 हजार 900 असून अमरावती 1 हजार 600, अकोला 1 हजार 432, यवतमाळ 1 हजार 788, बुलडाणा 676, वाशिम 404 असे आहेत.

सुरुवातीपासून कालपर्यंत पाचही जिल्ह्यात एकूण 3 लाख 58 हजार 433 रुग्ण आढळले. अमरावती 97 हजार 42, अकोला 58 हजार 703, यवतमाळ 73 हजार 57, बुलडाणा 87 हजार 721, वाशिम 41 हजार 910 असे आहेत.

कालपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 52 हजार 43 असून त्यात अमरावती 95 हजार 230, अकोला 57 हजार 140, यवतमाळ 71 हजार 192, बुलडाणा 86 हजार 991 व वाशिम 41 हजार 490 असे आहेत.

आजपर्यंत 3 लाख 58 हजार 604 रुग्णांचे चाचण्या करण्यात आल्या. त्यात अमरावती 97 हजार 93, अकोला 58 हजार 768, यवतमाळ 73 हजार 89, बुलडाणा 87 हजार 737, वाशिम 41 हजार 917 असे आहेत.

00000