अमरावतीत छ.शिवाजी महाराजांची राजापेठ उड्डाणपुलावरील स्थापित केलेली प्रतिमा हटविली

0
6848
Google search engine
Google search engine

अमरावती Amravati शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर युवा स्वाभिमान पार्टीच्या पुढाकाराने शिवप्रेमींनी बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने मध्यरात्रीनंतर प्रचंड पोलिस बंदोबस्तात हटविला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खासदार नवनीत राणा व आमदार श्री रवी राणा यांना त्यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवाजी महाराजांचा पुतळा 12 जानेवारी रोजी विनापरवानगी बसवण्यात आला होता. तेव्हापासून येथे दररोज युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते व शिवप्रेमी पूजाअर्चा करीत होते. सदर पुतळा कायमस्वरूपी तेथेच ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या बहाल करण्याची मागणी आमदार राणा यांनी मनपा प्रशासनाकडे केली होती.