ब्रेकिंग न्यूज :- चांदुर बाजार मर्डर प्रकरण – पहा कोनाकोणावर झाले गुन्हे दाखल ; पोलीस विभागाकडून प्रेस नोट जारी

0
16627
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार :- स्थानिक सचिन बार जवळ काल रात्री 10.45 च्या दरम्यान चांदुर बाजार शहरातील काही मित्र दारू पित असताना शाब्दिक वाद होऊन त्यामध्ये धारधार शस्त्राने मारहाण होऊन सदर घटनेत मोहमद शहजाद अब्दुल रोउफ वय 25 वर्षे रा.चांदुर बाजार याला मांडीत व शेख जावेद शेख हसन 22 वर्षे रा.चांदुर बाजार याला पोटात चाकू मारून गंभीर जखमी केले त्या नंतर लगेच जखमींना इरविन हॉस्पिटल ला अमरावती येथे पुढील उपचाराकरिता भरती केले असता त्यातील शेख जावेद शेख हसन वय 22 वर्ष याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला .

मोहम्मद शहजाद अब्दुल रोउफ रा. चांदुर बाजार यांचा फिर्यादीवरून आरोपी घनश्याम उर्फ बीटवा ईश्वरलाल दिठोर वय 25 वर्षे कलम 302,307,504,506 प्रमाणे आज गुन्हा दाखल करण्यात आला .

सदर गुन्ह्यामध्ये आरोपी
1) घनश्याम उर्फ बीटवा ईश्वरलाल दिठोर वय 25 वर्षे
2) करण राजेंद्र खोडे वय 28 वर्ष
3) श्रीकेश सुधीर ढोमणे वय 25 वर्ष सर्व राहणार चांदुर बाजार यांना अटक करण्यात आली आहे ,सदर गुन्ह्यात आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता आहे सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अधिकारी यांचा मार्गदर्शना खाली सपोनि श्री सुरेंद्र अहिरकर करीत आहेत