भारतीय महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस यांची जयंती संपन्न

0
461
Google search engine
Google search engine

अमरावती प्रतिनिधी :
भारतीय विद्या मंदिरद्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती, राष्ट्रीय सेवा योजना द्वारा सुभाषचंद्र बोस यांची जयंती संपन्न झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आराधना वैद्य, प्रमूख उपस्थिती अहमद अली (ASI), राजापेठ पोलिस स्टेशन, प्रा. निलेश कडू अमरावती जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,डॉ. प्रशांत विघे, कार्यक्रम अधिकारी, डॉ. स्नेहा जोशी महिला कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम डॉ. आराधना वैद्य यांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. आराधना वैद्य म्हणाल्या की, भारताला पारतंत्र्य पासून मुक्त करण्यासाठी देशाच्या विविध स्वातंत्र्यसेनानी सहभाग दर्शविला त्यामधील एक अग्रणीय नाव सुभाष चंद्र बोस यांचे आहे. त्या काळामध्ये त्यांचा एक नारा प्रसिद्ध होता ‘ तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा ‘ अशी घोषणा देऊन सुभाषचंद्र बोस यांनी तरुणांमध्ये स्वातंत्र्य आंदोलनात चैतन्य निर्माण केले. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सुभाष चंद्र बोस यांचे स्थान अद्वितीय असे मानावे लागेल. १९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा संदर्भात“देशभक्तांचा देशभक्त” असा उल्लेख केला होता.पुढे बोलताना डॉक्टर प्रशांत विघे म्हणाले की , सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला “जय हिंद” चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यायातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंमसेवक सर्वेश पिंपराळे , अभिजीत भेंडे , सौरभ जाधव,पवन वैद्य सहभाग दर्शविला. कार्यक्रमाच सूत्रसंचलन डॉ. पल्लवी सिंग आभार डॉ. सुमेध वरघट यांनी मानले.