शेगाव नगर परिषद तर्फे इलेक्ट्रिक वाहन धारकांचा सत्कार…

0
686
Google search engine
Google search engine

शेगांव:- स्थानिक राठी इलेक्ट्रिक बाईक शोरुम मध्ये माझी वसुंधरा अभियान 2 अंतर्गत नगर परिषद कडून ई- बाईक धराकांचे सत्कार करण्यात आले.

त्यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी मोकासरे साहेब यांनी पर्यावरण विषय माहिती देतांना सांगितले ओझन वायू पर्यावरणातील उपयुक्त वायू आहे की ज्यामुळे समतोल राखण्यास मदत होते. त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो. आपण कसे काम करतात त्याचे फायदे काय त्या करिता झाडे लावा झाडे जगवा ,पर्यावरण पूरक गोष्टी कडे जास्त लक्ष देण्याची आज  आवश्यक आहे असे अनेक उपक्रम आपण राबविले पाहिजे तसेच आपण जे इलेक्ट्रिक वाहन घेतले आहे.त्यामुळे आपण एक प्रकारे पर्यावरण वाचव्याचे काम करीत आहात कारण की पेट्रोल च्या वाहन चालवताना जे प्रदूषण होते जसे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदुषण अशा प्रदूषणाला आपण आळा घालू शकतो असे म्हणून त्यांनी उपस्थित ई – बाईक धारकांचे सत्कार करीत आभार मानले या प्रसंगी सोबत आनंदाची बाब सांगत म्हणाले की नगर परिषद मार्फत आम्ही विनामूल्य चार्जिंग पॉइंट देखील बसविला आहे. हा चार्जिंग नगर परिषद शाळा क्र. ०५ जवळ देण्यात आला तरी आपण याचा लाभ घ्यावा. तसेच आणखीन आम्ही भविष्यामध्ये असेच चार्जिंग पॉइंट बसविणार आहोत.
ई बाईक शोरुम चे संचालक राठी यांनी गाडी विषयी माहित दिली. या वेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पैकी ग्राहकांनी आपल्या ई- बाईक पासून झालेले फायदे व अनुभव सांगितले .या कार्यक्रमा मध्ये वृध्द मंडळी , लहान व्यापारी, शिक्षण घेतलेली विद्यार्थी, महिला वर्ग उपस्थित होते. यावेळी उपस्थितीतानी नगर परिषद व अधिकारी मंडळीचे आभार मानले.
इलेक्ट्रिक विभागाचे प्रमुख ढवळे साहेब तसेच कर्मचारी यांची उपस्थिती होती.