अभ्यासिकेत संत तुकाराम महाराज जयंती साजरी

0
668
Google search engine
Google search engine

शेगांव:-   दि. २ फेब्रु २०२२ :- शेगांव राष्ट्रमाता इंधिरा गांधी न. प. हायस्कूल, शेगांव स्थित जगतगुरु संत तुकाराम महाराज अभ्यासिका येथे काल संत तुकाराम महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळी अभ्यसिकेचे नोडल अधिकारी इंजी. संजय मोकासरे हजर होते.

अभ्यासिकेत सायं. ७ वाजेच्या दरम्यान जगतगुरु तुकाराम महाराजांच्या प्रतिमेला विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नोडल अधिकारी मोकासरे यांनी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांनी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
सोबतच जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या नावाने असलेली अभ्यासिका ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत विद्यार्थ्यांना अधिक सोईसुविधा नगरपरिषद शेगांवच्या माध्यमातून देत विद्यार्थ्यांना यशाच्या वाटा उपलब्ध करून देईल असे ही ते म्हणाले, त्यावेळी ग्रंथपाल रिना सोळंके, सहाय्यक ग्रंथपाल रामचंद्र पवार आणि कर्मचारी वसंता भारसाकडे यांच्या समवेत अभ्यसिकेतील विद्यार्थी हजर होते.

जगतगुरु संत तुकाराम महाराज अभ्यासिकेची वैशिठ्ये

सुसज्ज अभ्यासिका बैठक व्यवस्था, आर.ओ. पाण्याची सुविधा, स्वच्छता गृह, विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र बैठक सुविधा, अभ्यासासाठी कॉम्प्युटर हॉल, चर्चा व मार्गदर्शन हॉल, नियमित काउन्सिलिंग ची सुविधा, तज्ञांचे मार्गदर्शन दिले जाते.