व्यक्तिमत्व विकासासाठी कौशल्य विकास आवश्यक – डॉ. हरिदास आखरे

0
568
Google search engine
Google search engine

व्यक्तिमत्व विकासासाठी कौशल्य विकास आवश्यक – डॉ. हरिदास आखरे

शेगांव:-  स्थानिक सरस्वती महाविद्यालय शेगाव येथे कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून श्रीमती कोकीळाबाई गावंडे महिला महाविद्यालय दर्यापूर येथील डॉ. हरिदास आखरे यांनी मोटिवेशन, गोल सेटिंग व इंटरव्यू स्किल या तीन विषयावर कार्यशाळा मार्गदर्शन केले. प्रथमत: शेगावीचा राणा संत गजानन महाराज व माता सरस्वती यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष बोथे डॉ.हरिदास आखरे प्रा.प्रवीणकुमार रामटेकेकर डॉ.मेघना खत्री कार्यशाळा समन्वयक प्रा. पल्लवी पाटील हे उपस्थित होते. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री शरदजी शिंदे, सचिव सौ. साधनाताई शरद शिंदे यांच्या मार्गदर्शना मध्ये ही कार्यशाळा संपन्न झाली. प्रथमत: डॉ. हरिदास आखरे यांनी संपन्न व्यक्तिमत्वासाठी कौशल्यांचा विकास करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अंगीभूत कौशल्य ओळखून त्यांचा पद्धतशीरपणे विकास करणे व आपले व्यक्तिमत्त्व संपन्न करणे हेच सुखी जीवनाचे रहस्य आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तीन सत्रांमध्ये चाललेल्या या कार्यशाळेत प्रथमता मोटिवेशन स्वयंप्रेरणा म्हणजे काय? आणि प्रेरणेतून आपल्याला आंतरिक शक्ती कशी प्राप्त होते हे त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवरायांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर व अंगीभूत कौशल्यांचा बळावर स्वराज्य स्थापन केले. ही घटना युवकांसाठी सदैव मोठी प्रेरणा देत राहील असे मत त्यांनी यावेळी मांडले. द्वितीय सत्रात ध्येयनिश्चिती का करावी व कशी करावी हे गोल सेटिंग च्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केले. ज्याचे ध्येय निश्चित आहे त्याला नक्की मार्ग सापडत असतो. आणि ज्याला ध्येयाचा ध्यास लागतो त्याला श्रमाचा त्रास कमी होतो. तिसऱ्या सत्रांमध्ये मुलाखत तंत्राचे पायाभूत पायाभूत पैलू उलगडून दाखविले. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे स्पेसिमन इंटरव्यू त्यांनी घेतले. कार्य शाळेमध्ये प्राध्यापक वृंद व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.