अमरावती ब्रेकिंग :- १० किलो सोन्यासाहित रोख रक्कम पोलिसांचा धाडीत जप्त

0
5419
Google search engine
Google search engine

 

अमरावती शहरातील दसरा मैदान परिसरातील राधाकृष्ण अपार्टमेंट मधील फ्लॅट क्रमांक 401 मध्ये काही व्यक्ती संशयास्पद असल्याची गुप्त माहिती मध्यरात्रीच पोलिसांना मिळाली. त्याआधारे राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे व त्यांचे पथक व्हिडीओ कॅमेरा घेऊन या अपार्टमेंटमध्ये दाखल झाले. यावेळी त्या फ्लॅटमध्ये राजेंद्र सिंग सह अन्य दोन व्यक्ती राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांनी यावेळी घराची झडती घेतली असता दहा किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने सापडले. याची सोन्याची किंमत पाच कोटी इतकी आहे. शिवाय पाच लाख रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणाची संपूर्ण माहिती पोलिसांनी आयटी विभागालाही दिली आहे, असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणातील मूळच्या राजस्थानातील राजेंद्र सिंग या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला न्यायालयातदेखील दाखल करण्यात येणार असल्याचं पोलीस निरीक्षक श्री मनीष ठाकरे यांनी सांगितलं.

 

सोन्याची किंमती सुमारे पाच कोटी
या कारवाई दरम्यान दहा किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने सापडले. याची सोन्याची किंमत पाच कोटी इतकी आहे. शिवाय पाच लाख रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणाची संपूर्ण माहिती पोलिसांनी आयटी विभागालाही दिली आहे, असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणातील मूळच्या राजस्थानातील राजेंद्र सिंग या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला न्यायालयातदेखील दाखल करण्यात येणार असल्याचं पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितलं.

व्यवसाय चार वर्षांपासून
धाड पडली त्याठिकाणी राजेंद्र सिंग राव व्यवसाय करतो. गिरीराज जगदीश सोनी व अशोक सत्यनारायण खंडेलवाल हे त्याचे साथीदारही आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. तो चार वर्षांपासून हे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कच्च्या चिठ्ठ्या-पट्ट्यांवरून काहीतरी गडबड दिसते.