कुष्टा बु.शेतशिवारातील शेततळ्यात ११ वर्षीय मुलींचा बडून मृत्यू, वाचवयाला गेलेल्या बाजीलालचा ही मृत्यू..

0
813
Google search engine
Google search engine

अचलपूर तालुक्यातील कुष्टा बुद्रुक येथे 13 मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता च्या सुमारास गावालगतच असणाऱ्या शैलेश हरिदास नाथे यांच्या शेतातील शेततळ्या नजिक गावातीलच अकरा वर्षीय हर्षाली विनोद वांगे मुलींचा अचानक तोल गेल्याने ती शेततळ्यात बुडाली असता शेतातील रखवालदार यांचा मुलगा २५ वर्षीय युवक बाजीलाल मुन्ना कास्‍देकर तिला वाचविण्यासाठी गेला  त्याचाही त्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला गावालगत असणाऱ्या शेततळ्यात एका मुलीचा व मुलाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे घटनेची माहिती गावात कळताच शेततळ्यात नजीक लोकांनी गर्दी करत पोलीसांना माहिती दिली प्रथोट पोलिसांनी दोघांचे मृतदेह शोध मोहीम सुरू केली