अती तिथे मातीच……..!

0
525
Google search engine
Google search engine

मांस आहार घेणाऱ्यांना आता ‘चिकन, मटन’ मिळणार नाही!

मुख्याधिकऱ्यांची ‘मटन मार्केट’वर धडक कारवाई

शेगांव:- शेगांव शहरातील मटण मार्केट वर नगरपरिषदेने धडक कारवाई करीत बाजारातील मटण मार्केटला सिल ठेकले आहे. स्वच्छता व रख-रखाव या बाबींच्या नियमांची पायमल्ली झाल्याने मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी कारवाई करीत सर्व मार्केट पुढील आदेशांपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मांस आहार घेणाऱ्यांना आता काही दिवसतरी ‘चिकन, मटन’ मिळणार नाही!

शेगाव विकास आराखडा अंतर्गत, शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी महाराष्ट्र शासनाने भरगच्च असा निधी दिला त्या निधीतून शासकीय कार्यालय, पोलीस स्टेशन, व्यापारी संकुल आणि इतर कार्यालये उभारण्यात आली. शहरातील आठवडी बाजाराच्या त्याच व्यापारी संकुलाचा भाग मांस विक्रेत्यांना देण्यात आला व शासनाच्या स्वच्छ मिशन उपक्रमाचे मांस विक्रीबाबत आणि स्वच्छतेची काही बंधने सुद्धा घालण्यात आली.

परिसराची स्वच्छता, टाकावू भागाची विल्ल्येवाट आणि विशेष म्हणजे उघड्यावर मांस विक्री नाही अशी बंधने असताना देखील उघड्यावर मांस विक्री होत होती, त्यामुळे ज्यांची दुकाने होती त्यांचे ग्राहक बाहेरील मांस विक्रेते पळवत त्यातुन आतील दुकाने पुन्हा बाहेर आली आणि तोच कचरा पुन्हा आला, तीच अस्वच्छता पुन्हा होऊ लागली आणि शेवटी मार्केट जुने मच्छी बाजार झाले!

शेगांवतील व्यापारी संकुला शेजारी लागून रोजच्या जीवनामध्ये लागणाऱ्या वस्तूंची दुकाने आहेत, भाजीपाला बाजार आहे, तिथे गावातील नागरिक, पर्यटक, विशेषतः महिला वर्ग मोठ्याप्रमाणावर येतो. झालेल्या अस्वच्छतेमुळे दुर्गंधी तसेच इतर आजार देखील उद्भवतात, अनाधिकृत असलेले मटन व्यवसाय रस्त्यावर मांस विक्री करतात अशी तक्रार काही सुज्ञ व्यक्तींना नगरपरिषदेची दिली, त्यानंतर शेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी नोटीस बजावत तसेच सूचना रिक्षा फिरवत ‘जिल्हाधिकारीच्या आदेशानुसार बाहेर असलेली दुकाने ताबडतोब बंद करण्यात यावी’ सुचना दिल्या पण तेथील व्यवसायिकांनी त्याकडे दुर्लक्ष करीत आपला मनमानी व्यवसाय सुरूच ठेवला याचाच परिणाम म्हणून मुख्याधिकारी यांनी मुख्यमार्केट बंद करून कारवाई केली. तरी सुद्धा मास व्यायसायीक आपली काही दुकाने मुख्य रस्ता जिथे मच्छी मार्केट स्वतंत्र आहे तिथे आपली दुकाने मांडलाय म्हणजे परत सामान्य लोकांना त्रास या कारवाईमुळे मांस आहार करणाऱ्यांवर सुद्धा अप्रत्यक्षपणे संकट ओढावले आहे, ‘नियमावली/ सूचना देऊन पुन्हा लवकरात लवकर मार्केट सुरू करा’ अशा चर्चा सुध्दा सुरू आहेत.

राजकारणी घेताय कारवाईचा ‘फायदा’?

कारवाईमुळे गरज झालेल्या वातावरणात अनेक राजकारणी आपली राजकीय पोळी शिजवण्याच्या तयारीत दिसत आहेत. “हा व्यवसायीकांवर अन्याय आहे!मी उपोषण करेल!, मैं तुम्हारे साथ हु! आपण पाहून घेऊ, निवडून आल्यानंतर नक्की सुरू करू”! अशा वाक्यांचा भडीमार करून आपली मते पक्की करण्याच्या प्रयत्नात आहेत अशी चर्चा देखील डोकावत असल्याची दिसते.