हेतुपरस्पर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या

0
377
Google search engine
Google search engine

शेगाव पोलिस यंत्रना संशयाच्या चौकटित

शेगांव – तीन दिवस अगोदर महाराष्ट्र टुरिझम म्हणजेच एमटीडीसी शेगाव येथे अवैध प्रकारे सुरू असलेल्या आनंद मेळाव्यातील खेळण्याजवळ काही युवकांमध्ये वाद निर्माण झाल्यावर पोलिसांनी हेतुपुरस्पर पणे ०७ युवकांना ताब्यात घेऊन त्यांनीच हे भांडण सुरू केलं असं करत त्यांच्यावर 353 चे गुन्हे दाखल करून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप स्थानिक आमदार संजय कुटे यांनी केला याचा निषेध म्हणून काल दुपारच्या नंतर संजय कुटे यांनी पत्रकार परिषद घेतली, आणि या पत्रकार परिषदेत आमच्यावर कितीही अन्याय झाला सरकारने काहीही खोटं नाटक केलं तरी कोर्ट आमच्या बाजूने आहे आम्ही कोर्टात न्याय मागू असं बोलले या गोष्टीचा प्रतिसाद मुंबईत सुद्धा दिसून आला, माझं म्हणणं विरोधकांना समजलं नाही असं आज निषेध सभेमध्ये आमदार संजय कुटे यांनी त्याचा उल्लेख केला,
यावेळी खामगाव बजरंग दल चे अमोल अंधारे यांनीसुद्धा पोलिसांवर ताशेरे ओढत ठाणेदार यांचे रायटर आणि त्यांचे सोबती कुठे कुठे हप्ते वसुली करतात याची चौकशी करण्याची मागणी केली शिवाय आमच्या मागणीची दखल प्रशासनाने घेतली नाही तर सोमवारी एसडीओ कार्यालय खामगाव येथे आम्ही घंटानाद करू असेही जाहीर केले, तर तर शेगाव येथील गांधी चौकामध्ये सर्वांनी काळे फीत लवून या घटनेचा निषेध  केला.

शेगाव माजी भाजप शहराध्यक्ष डॉ.  बानोले
यांनीसुद्धा पोलिसांवर चांगलेच आरोप करीत तंटामुक्तीचा पुरस्कार शेगाव पोलिस स्टेशनला द्यावा असं संबोधलं या अगोदर सुद्धा शेगाव पोलीस स्टेशन वर काही समाजकंटकांनी रात्री दोन वाजता हल्ला केला होता परंतु त्यांना 353 च्या गुन्ह्याखाली अटक न करता दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली यानंतर शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन समोर काही युवकांनी पोलिस प्रशासनाच्या विरोधात नारे देखील लावले होते यावरून पोलीस प्रशासनाचे कार्य संशयास्पद तर नाही ना असा अंदाज निर्माण होतो आणि आज-काल प्रत्येक व्यक्ती केंद्रीय तपास यंत्रणेची मागणी करत आहे तर काय आता राज्य तपास यंत्रणेवर जनतेचा विश्वास राहिला नसावा का असाही प्रश्न निर्माण होतो त्यामुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ तर अशा पोलीस कर्मचऱ्यांन कठोर कार्यवाही व्हावी यांना बडतर्फ करावे असे शहरातील जनता बोलताना दिसते आहे. शहरात सुरू असलेली अवैध धंदे यांना कसे दिसत नाही की ….? काय जनतेनी यांच्या विश्वास ठेवावं की आता न्याय मिळण्या साठी किंवा तक्रार करण्यासाठी बुलढाणा जावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे असा आता परत म्हंवसे वाटते ” अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा”