तेरवी चा खर्च न करता जनावरांकरिता जलकुंभ उभारला

0
256
Google search engine
Google search engine

तेरवी चा खर्च न करता जनावरांकरिता जलकुंभ उभारला आडसूळ च्या

वानखडे परिवाराचा स्तुत्य उपक्रम

शेगाव :——- अडसूळ च्या वानखडे परिवाराने समाजाला नवी दिशा देत तेरवी, वर्ष श्राद्ध चा खर्च न करता गावाच्या प्रमुख समस्यांना प्राधान्य देत जनावरांना पिण्या करिता जलकुंभ उभारला. दिनांक 9 एप्रिल रोजी अडसूळ येथे स्वर्गीय मातोश्री भिकाबाई शालिग्राम वानखडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त स्वखर्चाने गुराढोरांना पाणी पिण्याकरिता जलकुंभाचां लोकार्पण सोहळा काँग्रेस नेते दयाराम वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शालिग्राम जी वानखडे यांच्या हस्ते पार पडला . अनेक वर्षापासून प्रामुख्याने मार्च ते जून या कालावधीत नदीचे पाणी आटत असल्याने जनावरांना पाणीच भेटत नव्हते ही प्रमुख समस्या लक्षात घेता वानखडे परिवाराने गुराढोरांच्या पाणी पिण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढत जनावरांच्या प्रमुख रस्त्यावर स्वखर्चाने बोरवेल खोदून चार फूट रुंद,वीस फूट लांबीचा जलकुंभ तयार करून चोवीस तास पाणी उपलब्ध करून दिल्याने गावातील मंडळी समाधान व्यक्त करीत आहे,. या कार्यक्रमाला मुकुंदराव वाघ, विश्वनाथ आढाव, विशंभर गिरी,सुरेश भटकर ,समाधान इंगळे, नंदूसेठ डागा ,समाधान माहनकार, ज्ञानदेवराव गावंडे, अरुण उन्हाळे, शंकर ढोले, किसन कोल्हे, विनोद देशमुख,किसनराव वानखडे, गजानन वानखडे सर्व वानखडे परिवार सह गावातील मंडळी यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉक्टर जनार्दन वानखडे यांनी केले तर आभार अक्षय वानखडे यांनी मानले.