कन्हेरवाडी येथील भीम जयंती ध्वजारोहण मा.श्री.मानिकभाऊ फड यांच्या हस्ते संपन्न

0
416
Google search engine
Google search engine

शासकीय अधिकारी व सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित राहुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी

बीड: नितीन ढाकणे
दि.14 रोजी महामानव, परमपूज्य, विश्वरत्न , बोधिसत्व , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त कन्हेरवाडी येथे मोठ्या थाटामाटात व जल्लोशामध्ये जयंती साजरी करण्यात आली होती.
यावेळी प्रतिवर्षाप्रमाणे अध्यक्ष पद भूषवणारे श्री.अंबादास दादा रोडे यांनी सर्व प्रमुख मान्यवरांचे व प्रमुख पाहुण्यांची शाल श्रीफळ फेटे ,पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले होते.कार्यक्रमा वेळी प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कृ.उ.बा. समितीचे संचालक मा.माणिकभाऊ फड , प्रा.मधुकर आघाव सर, नायब तहसीलदार बाबूराव रुपनर , परळी ग्रा.पो.स्टे.चे स.पो.निरीक्षक मारोती मुंडे, स.पो.निरीक्षक विशाल शहाणे, पो.उपनिरीक्षक गणेश झांबरे,सुरेश नाना फड, सं.गां. नि.यो.सूर्यकांत मुंडे, ग्रा.पं.स.विकास मुंडे ,युवा नेते. ज्ञानेश्वर मुंडे,कवी.पांनगावकर,भीम जयंती कमिटी चे अध्यक्ष मा.श्री अंबादास दादा रोडे , उपाध्यक्ष भीमराव रोडे,गोपीनाथ दादा,
आदी मान्यवर उपस्थित होते.
बौद्ध विहार येथून गावातील प्रमुख रस्त्यावरून भव्य शोभायात्रेसह मोठ्या थाटा माठात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीमध्ये भावठाणा येथील लॉर्ड बुद्धा युवा मंच लेझीम संघ , साकुड येथील लेझीम संघ हे प्रमुख आकर्षण होते.
शेवटी सर्व उपस्थितांचे आभार संग्राम रोडे यांनी मानले.
यावेळी ज्ञानोबा रोडे,सुधाकर रोडे,रोहिदास रोडे , देविदास रोडे,मुंजाजी रोडे,प्रकाश रोडे, सुभाष रोडे, पिंटू रोडे,बेगराज रोडे,धनराज रोडे,शरद रोडे, शितलकुमार रोडे,नागेश रोडे,पवन रोडे ,छत्रभुज घाडगे, सायस घाडगे,सुरेश घाडगे ,अमर रोडे,सचिन रोडे,शिवम रोडे,सागर रोडे,रूद्र रोडे ,माधव सरवदे ,प्रीतम सरवदे आधी बहुसंख्य भीमसैनिकांची उपस्थिती होती.