सेव्हन स्टार’ न्यूज चॅनेलचे राज्यस्तरीय ‘स्काय स्क्रॅपर स्टार अवॉर्ड’ विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना जाहीर

Google search engine
Google search engine

मो

22 एप्रिलला दिग्गज मान्यवरांच्या हस्ते महाबळेश्वरमध्ये होणार वितरण सोहळा

‘सेव्हन स्टार’ न्यूज चॅनेलने अल्पावधीतच सर्वसामान्य जनतेत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. खडतर प्रवासातून यशाला गवसणी घातलेल्या विविध क्षेत्रातील मातब्बर आणि कर्तृत्ववान व्यक्तींना “राज्यस्तरीय स्काय स्क्रॅपर स्टार अवॉर्ड 2022” पुरस्काराने सन्मानित केले जाणार असून पश्चिम महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तब्बल 32 व्यक्तींना येत्या 22 एप्रिलला शानदार पुरस्कार वितरण सोहळयात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय ‘स्काय स्क्रॅपर स्टार अवॉर्ड – 2022’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती सेव्हन स्टार न्यूज चॅनेलचे संपादक विनायक पवार यांनी दिली.
‘सेव्हन स्टार’ न्यूज चॅनेलने बातम्यांच्या जोरावर तळागाळातील लोकांच्या समस्यां जाणून घेवून अनेकांना आजवर न्याय दिला. रोख-ठोक निर्भीड मत मांडून गरुडभरारी घेतली आहे. ‘सेव्हन स्टार’च्या या प्रवासात त्यांना प्रेक्षकांनी ही साथ दिली. म्हणूनच आज अडीच कोटी व्हीवर्सचा यशस्वी टप्पा गाठून सिल्व्हर बटनाचा चॅनेल मानकरी ठरला आहे.
सांगली जिल्ह्यातील विटा शहरातून सुरू झालेला ‘सेव्हन स्टार’ न्यूज चॅनेल आज तब्बल 35 देशात पाहिला जातो. महाराष्ट्रातील विविध 25 जिल्ह्यात रिपोर्टर सध्या कार्यरत आहेत. भक्कम अशा टीमने पूर्णपणे ताकदीने काम करून अल्पावधीतच
उंच भरारी घेत प्रेक्षकांच्या मनात आपली अनोखी प्रतिमा रुजवली. ‘सेव्हन स्टार’ने आज संपूर्ण टीमसमवेत अनेक कॉन्फरन्स घेऊन नवनवीन व अभिनव उपक्रम यशस्वीरित्या राबविले आहेत. ‘सेव्हन स्टार’ने केवळ व्हिडीओ बातम्या प्रसिद्ध करता सन 2019 मध्ये ‘झेप’ हा पहिला विशेषांक तर
सन 2021 मध्ये ‘उडान’ हा दुसरा विशेषांक प्रकाशित केला. आजवरच्या अनेक कॉन्फरन्स व मिटिंग या ‘सेव्हन स्टार’च्या प्रत्येक ‘स्टार रिपोर्टर’साठी प्रेरणादायी व उत्साहवर्धक ठरल्या आहेत. तसेच प्रशासकीय सेवेतील अधिकारी, आमदार, खासदार, आयकर आयुक्त, कोरोनोयोध्ये, अभिनेते यांसारख्यांचे ‘ग्रेट-भेट’ ‘शो’ज करून त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात अत्यत संघर्षमय प्रवास करून यशाचं शिखर गाठलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींना त्यांच्या कामाची पोहोचपावती म्हणून चॅनेलच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या “राज्यस्तरीय स्कायस्क्रॅपर स्टार अवॉर्ड”चे प्रतापशेठ साळुंखे, अपर्णाताई देशमुख, डॉ. कृष्णत चन्ने, कपिल ओसवाल, शांतारामशेठ शिंदे, सविता जाधव, अशोकराव मोरे, समीर इनामदार, प्रदीप भिंताडे, प्रकाश सपकाळ, प्रा.अस्लम शिकलगार, डॉ. गणेश यमगर, विनोद साळुंखे, राजूशेठ जानकर, प्रा.आनंद गिरी, प्रा. मेजर पांडुरंग शितोळे, डॉ.उदयसिंग हजारे, प्रा. यु. टी. जाधव, शकील पटेल, संपतराव गावडे, सुभाष देवकाते, संतोष देशमुख, किशोर बडगुजर, हणमंत पवार, पै.संतोष वेताळ, अविनाश माने, प्रवीण करडे, पवनकुमार पोळ, विकास थोरात, हेमा पाकले, नवनाथ जाधव, कु.श्रेयस सगरे हे यंदाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. येत्या 22 एप्रिलला आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ‘स्कायस्क्रॅपर स्टार अवॉर्ड’ वितरण सोहळ्यात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते महाबळेश्वरमधील ‘द ग्रॅण्ड लिगसी’ या रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आला आहे.