शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बिनव्याजी, दिर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करावा – जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील

Google search engine
Google search engine

एकविसावे शतक हे स्पर्धेचे शतक असले तरी त्यामध्ये ग्रामीण भागाचे योगदान टाळता येणार नाही. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शुद्ध पाणी, नियमित वीजपुरवठा, दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सेवा, आणि अन्न सुरक्षा या पंचसूत्रीचा अंगीकार करावा लागेल.असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयाचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र विभाग आणि भारती विद्यापीठाचे ग्रामीण विकास प्रतिष्ठान केंद्र, सांगली आणि महिला महाविद्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘२१ व्या शतकातील ग्रामीण विकासापुढील आव्हाने’ याविषयावरील एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय परिषद संपन्न झाली.परिषदेचे उद्घाटन भारती विद्यापीठ पुणेचे विभागीय संचालक डॉ. एच. एम.कदम यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी डॉ. एच. एम्. कदम म्हणाले की, वैद्यकीय सेवा हा विकासाचा आत्मा आहे.
या प्रसंगी ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे बीजभाषण झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. वाय. कदम होते. स्वागतपर भाषणात परिषदेचे समन्वयक प्रा.संजय ठिगळे म्हणाले की, शाश्वत ग्रामीण विकास ही काळाची गरज आहे.
अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ. व्ही. वाय. कदम म्हणाले की,ग्रामीण विकासासाठी कृषी विकासावर अधिक भर देण्याची गरज आहे. पाहुण्यांची परिचय परिषदेच्या निमंत्रक प्रा. डॉ.दयावती पाडळकर यांनी करून दिला.
परिषदेच्या पहिल्या सत्रात मार्गदर्शन करताना डॉ. विजय मारुलकर म्हणाले की, खेड्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करणे देशाला सर्वच अर्थाने न परवडणारी गोष्ट आहे.
दुसऱ्या सत्रात मार्गदर्शन करताना शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ अनिल वावरे म्हणाले की, इथून पुढच्या काळात शाश्वत ग्रामीण विकासावर अधिकाधिक भर देण्याची गरज आहे. एवढेच नव्हे तर ग्रामीण विकासाच्या योजना जनताभिमुख झाल्या पाहिजेत.
परिषदेचा समारोप महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.विकास साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक माळी व प्रा. एम्. बी. कुंभार यांनी केले परिषदेचे आयोजन डॉ. शामराव कांबळे ,प्रा. श्रीकृष्ण मोहिते, अखिलेश शिंदे यांनी केले. तांत्रिक बाजू प्रा. अमोल शिंदे प्रा.कोळेकर व दिलीप देशमुख यांनी सांभाळली. उपस्थितांचे आभार परिषदेचे समन्वयक प्रा. संजय ठिगळे यांनी मानले.
————————————-