ग्रीन पाॅवर शुगर्स लि. गोपुज सहकारी साखर कारखाना सभासदांना शेअर्स साखर कार्डाचे वितरण. सभासदांना ५ रू. किलो दराने प्रतिवर्षी मिळणार ५० किलो साखर.

Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव न्युज
आज ग्रीन पॉवर शुगर्स लि. गोपुज तालुका खटाव जिल्हा सातारा या साखर कारखान्याच्या शेतकरी सभासदांना कारखाना कार्यस्थळावर शेअर्स कार्डचे वितरण कारखान्याचे जनरल मॅनेजर, सर्व अधिकारी, कर्मचारी, सभासद शेतकरी यांच्या उपस्थित करण्यात आले.
शेतकरी सभासदांना प्रति किलो 5/- रुपये प्रमाणे प्रती वर्षी 50 किलो साखर देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर मा.हणमंत जाधव साहेब यांनी दिली. तसेच कारखान्याच्या इतर सर्व सभासदांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपले शेअर्स कार्ड घेऊन सवलतीच्या दरातील साखरेचा लाभ घ्यावा असे आव्हान जाधव साहेब यांनी केले.
यावेळी कारखान्याचे असिस्टंट जनरल मॅनेजर मा. स्वरूप देशमुख, जनरल मॅनेजर फायनान्स मा. हणमंत पाटील,
प्रशासकीय अधिकारी मा.जगदीश यादव, शेती अधिकारी मा.राजाराम पवार, चिफ इंजिनिअर मा.शहाजी भोसले,
चिफ केमिस्ट मा.विठ्ठल ठोंबरे, OSD मा.विजय जगताप, डिस्टलरी इंचार्ज मा.अशोक कदम, कामगार कल्याण अधिकारी मा.विनोद यादव, सिव्हिल इंजिनिअर मा.सुनील पवार, जनसंपर्क अधिकारी मा.शेखर मोरे, शेअर्स विभाग प्रमुख मा.विजय चव्हाण, प्रकाश गडळे,विशाल माने, गणेश घार्गे, खाशाबा यादव,माणिकराव पाटील तसेच कारखान्याचे इतर अधिकारी, कर्मचारी, कारखान्याचे शेअर्स धारक, सभासद शेतकरी उपस्थित होते.