*राज्यमंत्री यांच्या बेलोरा गावातील प्रलंबित मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन ; भाजपा युवा मोर्चाचे गजानन राऊत यांच्या आंदोलनाची अद्याप दखल नाही*

0
473
Google search engine
Google search engine

 

बेलोरा :
चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा गावातील अनेक वर्षापासून प्रलंबित विविध महत्वाच्या मागण्यांसंदर्भात दिनांक २७ मे पासून ग्रामपंचायत कार्यालय समोर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा तालुका सरचिटणीस गजानन राऊत यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असून आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून अद्याप प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केलेला आहे.
महविकास आघाडी सरकार मधील राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या बेलोरा गावातील बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या व प्रशासनाकडून दुर्लक्षित असलेल्या मागण्या पूर्ण करणे, रखडलेले पांदन रस्त्यांचे बांधकाम सुरू करणे, वॉर्ड क्र.१ व २ मधील मुख्य काँक्रीटीकरण रस्त्यांचे त्वरित बांधकाम करणे, तसेच अनेक वर्षांपासून सांडपाणी साचत असल्याने आरोग्याचा धोका निर्माण झालेला असल्याने ती समस्या त्वरित सोडविणे इत्यादी मागण्यांसंदर्भात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा तालुका सरचिटणीस गजानन राऊत यांचे बेलोरा ग्रामपंचायत कार्यालय समोर दिनांक २७ मे २०२२ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू असून प्रशासनाने अद्यापपर्यंत एकही मागणी पूर्ण झालेली नसल्याने आंदोलन कर्त्यांचे आमरण उपोषण सुरूच असल्याने मागण्यांची दखल नघेतल्यास भारतीय जनता पक्ष चांदूर बाजार तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचे तालुका अध्यक्ष मुरली माकोडे, तालुका सरचिटणीस गोपाल तिरमारे, नितीन टींगणे, दीपक निमकर यांनी आपली भूमिका व्यक्त केली.