सासपडे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : संग्रामसिंह देशमुख. २७.५० लक्ष किंमतीच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन संपन्न.

Google search engine
Google search engine

सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी काम केले आहे. सासपडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देण्यास कमी पडणार नाही. ‌असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी केले.
ते सासपडे (ता.कडेगांव) येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
यावेळी सरपंच डॉ. सतीश जाधव, उपसरपंच.संभाजी जाधव, ग्रामसेवक.आर.बी.ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य.विठ्ठल महापुरे,विजय पोळ,जयसिंग पोळ,संपतराव पोळ,सदाशिव जाधव,उत्तम पोळ, प्रमुख उपस्थित होते.
संग्राम देशमुख पुढे म्हणाले की जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जिल्ह्यात तीन वर्षे पारदर्शकपणे कामे केली. सर्व सामान्य जनता केंद्रबिंदू मानून चौफेर विकास केला.जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पाणी पुरवठा योजनेचा जो शब्द सासपडे ग्रामस्थांना दिला होता. त्या आश्वासनाची वचनपूर्ती आज झाली आहे. हे काम लवकरच पूर्ण होऊन सासपडे ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
यावेळी विठ्ठल निकम, तानाजी जाधव, तानाजी पोळ, सुनील पोळ, शंकर पोळ, अजित पोळ, ॲड.संदीप जाधव, लालासो पोळ, जे के जाधव, पोपट पोळ, विलास महापुरे, रामचंद्र पोळ, शिवाजी पोळ , दादासो पोळ, पवार गुरुजी, सुनील पोळ, सुरेश जाधव, यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.