सांगली येथील जिद्द स्पोर्ट्स फाउंडेशनची स्केटींग खेळप्रकारात “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला” गवसणी* *संकल्प युवाशक्तीकडून विश्वविक्रमी खेळाडूंचा सन्मान सभारंभ संपन्न*

Google search engine
Google search engine

: बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग ॲकडमी कडून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या विश्वविक्रमासाठी आयोजित स्केटिंग या खेळ प्रकारात सांगली मधील जिद्द स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या खेळाडूंनी सलग ९६ तास लार्जेस्ट रोलरस्केट करुन विश्वविक्रम केला आहे. या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. जिद्द स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल खेळाडूंचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे.
प्रशिक्षक मा.प्रथमेश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जिद्द स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या काजल मेश्राम ,अंजली खोत ,आयुष देशपांडे,केजुल उत्तरे ,गाष्मिर नलवडे,अथर्व बागल ,हर्षदा बोरकर ,आदित्य गायकवाड,प्रज्ञा सावंत ,रुद्र नाईक,हर्षदा भोसले, प्रथमेश लोंढे यांनी सहभागी होऊन उत्तम स्केटिंग करून यश मिळवले.
यशस्वी खेळाडूंना जिद्द स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संचालक, प्रशिक्षक मा. प्रथमेश लोंढे सर , जिद्द स्पोर्ट्स अध्यक्षा भारती लोंढे मॅडम , संकल्प युवाशक्ती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सागर खंडागळे यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. या विश्वविक्रमी यशाबद्दल संकल्प युवाशक्ती महाराष्ट्र राज्यच्या वतीने विश्वविक्रमवीर खेळाडूंचा सत्कार मा.प्राध्यापक प्रकाश गायकवाड सर, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे मा.सचिन चोपडे ,पत्रकार मा. ऋषिकेश माने,मा. शरद साळुंखे,मा.मुबारक सनदी चाचा यांच्या हस्ते करण्यात आला.