कडेगावच्या सई महाडीकने १०० टक्के गुणांसह मारली बाजी तालुक्यात सर्वत्र कौतुक : मान्यवर नागरिकांकडून अभिनंदन व शुभेच्छा

Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव न्युज

कडेगाव येथील महात्मा गांधी विद्यालयाची विद्यार्थीनी
सई प्रदीप महाडीक रा.चिंचणी तालुका कडेगाव हिने
इयत्ता १० वीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून बाजी मारली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता दहावी परिक्षेच्या निकालात १०० टक्के गुण मिळवून सई हिने विद्यालयात आणि तालुक्यात प्रथम व गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा सन्मान प्राप्त केला आहे.
वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी सई हिने राष्ट्रीय प्रवेश व पात्रता चाचणी ‘नीट’
या परीक्षेची तयारी सुरू केली असून
लातूर महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे.सद्या ती लातूर येथे
नीट परीक्षेची प्राथमिक तयारी करित आहे.दररोज वर्गातील शिक्षणासोबतच ठराविक वेळेत न चुकता अभ्यास व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे आपल्याला १० वी परीक्षेत हे यश मिळाले आहे,असे तीने सांगून आपल्या यशाचे श्रेय शिक्षक वआई वडील,आजी आजोबा व कुटुंबियांना दिले आहे.अभिजित
कदम ज्युनिअर कॉलेज अमरापूर तालुका कडेगाव येथील प्राध्यापक प्रदीप महाडीक
व नेर्ली येथील प्राथमिक शाळेच्या शिशिक आरती महाडीक
यांची सई महाडीक ही
मुलगी असून पत्रकार प्रताप महाडीक यांची पुतणी आहे.लहानपणापासून हुशार असलेल्या सई हिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. सईच्या यशाबद्दल
तिचे तालुक्यातील मान्यवर व नागरिकांनी तसेच शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी सर्वांनी सईला शुभेच्छा दिल्या.
चौकट :
कुटुंबात गुणवत्तेची परंपरा :
काही दिवसांपूर्वी
१२ वी परीक्षेचा निकाल
लागला या परीक्षेत सईची बहीण
साक्षी महाडीक हिनेही ९२.५०
टक्के गुण मुळवून तालुक्यात सर्वाधिक गुण मिळविले आता सई
ने ही १०० टक्के गुण मिळवून गुणवत्ता सिद्ध केली आहे.