भारतीय महाविद्यालयाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा स्वच्छता पुरस्कार

0
369
Google search engine
Google search engine

अमरावती प्रतिनिधी :
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती राष्ट्रीय सेवा योजना स्वच्छता पुरस्कार सत्र 2020 -21 चा भारतीय महाविद्यालय,अमरावतीला प्राप्त झाला
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. दिलीप मालखडे, कुलगुरु,संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, प्रमूख अतिथी डॉ. ओमप्रकाश मुंदे, अधिसभा, सदस्य, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ
प्रमूख उपस्थिती डॉ राजेश बुरंगे संचालक, रा.से.यो.संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती डॉ. नरेंद्र माने, अमरावती जिल्हा समन्वयक, डॉ.योगेश पोहकर, वाशिम जिल्हा समन्वयक , डॉ.रत्नदीप कणकाळे यवतमाळ जिल्हा समन्वयक ,उपस्थित होते.
सत्र 2020-21 चां संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती राष्ट्रीय सेवा योजना स्वच्छता पुरस्कार
डॉ. दिलीप मालखडे, कुलगुरु,संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. आराधना वैद्य,
डॉ. प्रशांत विघे, कार्यक्रम अधिकारी, डॉ. स्नेहा जोशी महिला कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना तसेच रा.से.यो.स्वयंसेवक यांनी स्वीकारला. तसेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ उत्कृष्ठ रा.से.यो.स्वयंसेविका कू.वैष्णवी दातीर यांना प्राप्त झाला.
या कार्यक्रमासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील महाविद्यायातील प्राध्यापक,
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंमसेवकांनी सहभाग दर्शविला.