सरपंचाच्या घरी ९ हजार २०० रूपयांची देशी दारू पकडली ; २३० देशी दारूच्या पावट्या जप्त , चांदूर रेल्वे पोलिसांची कार्यवाही;

0
5543
Google search engine
Google search engine

 

चांदूर रेल्वे:

गुप्त खबरीवरून अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलिसांनी धाडीत चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर सरपंच यांच्या घरी ९ हजार २०० रूपये किंमतीच्या देशी दारूच्या २३० पावट्या सापडल्या. चांदूर रेल्वे पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत सरपंच यांच्या घराच्या कोपऱ्यातून पंलगाखाली गोल्डन संत्रा कंपनीच्या ९० मिलीच्या ९ हजार २०० रूपये किंमतीच्या देशी दारूच्या पावट्या सापडल्या. या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी ६५ (ई) महाराष्ट्र दारू बंदी कायदा १९४९ अन्वये कार्यवाही करीत सरपंच पती राजु शंकर सुर्यवंशी (वय ४०) रा. सावंगी मग्रापूर यांना समजपत्र देवून सोडण्यात आले. या कार्यवाहीत चांदूर रेल्वेचे ठाणेदार विलास कुलकर्णी, हे.काँ. श्रीकृष्ण सिरसाट, हे.काँ. शिवाजी घुगे, ना.पो.काँ. प्रविण मेश्राम, ना.पो.काँ. नितीन शेंडे यांनी महत्वाची भूमिका बजावली.