अमरावती जिल्हा ब्रेकींग न्युज :- मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले ; रेल्वेची वाहतूक विस्कळीत – दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

0
28417

मार्गावरील बहुतेक गाड्या रद्द काहींचा मार्गात बदल

काही ट्रेन रूट मध्ये बदल नागपूर – नरखेड – चांदुर बाजार मार्गे बडनेरा 

*चांदूर रेल्वे –

नागपूर वरून बडनेरा कडे जाणाऱ्या मालगाडीचे डब्बे रूळावरून घसरल्याची घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड रेल्वे स्टेशनजवळ रात्री 11 वाजताच्या दरम्यान घडली. या गाडीचे तब्बल 18 डब्बे या दुर्घटनेत बाधित झाली असून कोळसा वाहून नेणारी ही मालगाडी होती. या अपघातानंतर रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झाली आहे. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम हे युद्ध स्तरावर सुरू आहे.

 

२२८४५ पुणे-हटिया एक्‍स्‍प्रेस,

१२२६१ सीएसएमटी-हावडा एक्‍स्‍प्रेस,

१२१३९ सीएसएमटी-नागपूर

या तीन एक्‍स्‍प्रेस गाड्या चांदूर बाजार ते नरखेड मार्गे वळवण्‍यात आल्‍या आहेत.

२२८४७ विशाखापट्टनम-एलटीटी,

१२६५६ चेन्‍नई-अहमदाबाद एक्‍स्‍प्रेस नागपूर-नरखेड-चांदूरबाजार- बडनेरामार्गे वळवण्‍यात आली आहे.

याशिवाय १११२२ वर्धा-भुसावळ पॅसेंजर,

१२१४० नागपूर-सीएसएमटी एक्‍स्‍प्रेस धामणगाव ते नागपूर परत आणि रद्द, १२११९ अमरावती-नागपूर, ११०४० गोंदिया-कोल्‍हापूर महाराष्‍ट्र एक्‍स्‍प्रेस, ०१३७२ वर्धा-अमरावती, १७६४२ नरखेड-काचीगुडा, १११२१ भुसावळ-वर्धा, १२१०६ गोंदिया-सीएसएमटी, १२१३६ नागपूर-पुणे, १२१२० अजनी-अमरावती, १२१४० नागपूर-सीएसटीएम, ०१३७४ नागपूर-वर्धा या गाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत.
२०८१९ पुरी-ओखा वाडी-दौंड-मनमाड-जळगाव मार्गे, १२६५६ चेन्नई-अहमदाबाद नरखेड-चांदूर बाजार-बडनेरा मार्गे, १२८३४ हावडा-अहमदाबाद पुलगाव-नागपूर-नरखेड-चांदूर बाजार-बडनेरा मार्गे, १२८६० हावडा-सीएसटीएम नागपूर–चांदूर बाजार-बडनेरा मार्गे, १२१२९ पुणे-हावडा मार्गे बडनेरा-चांदूर बाजार-नागपूर, १२८४४ अहमदाबाद-पुरी बडनेरा-चांदूरबाजार-नरखेड-नागपूरमार्गे, १८०२९ एलटीटी-शालीमार बडनेरा-चांदूर बाजार-नागपूर मार्गे वळवण्‍यात आल्‍या.