अमरावती जिल्हा ब्रेकिंग :- एकाच ऑफीसातील दोन कर्मचारी लाच लुचपत विभागाचा जाळ्यात ;

0
11600
Google search engine
Google search engine

अचलपूर :-

तक्रारदार यांनी दि.12/09/2022 रोजी समक्ष अचलपूर येथे तक्रार दिली की, त्यांचे वडीलांचे नावे असलेली अचलपूर येथील सिट नं.25 मधील प्लाँट न.108 चे प्रॉपर्टीकार्ड वरील मयत प्रतिभाबाई त्रिपाठी यांचे नाव कमी करण्यासाठीचे फाईल क्लिअर करण्यासाठी उप अधीक्षक भूमी, अचलपूर येथील लोकसेवक श्री.अमोल गिरी, सहाय्यक नजुल परिरक्षण भूमापक व श्री. देविदास परतेती, उपधीक्षक, भूमी अभिलेख अचलपूर जि.अमरावती हे तक्रारदार यांच्याकडे 15000/- रुपये लाच मागत असलेबाबत तक्रार प्राप्त झाली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि. 12/9/22 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे लोकसेवक श्री.परतेती व श्री.गिरी यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांची फाईल क्लीयर करण्यासाठी 15000/-रुपये लाचेची मागणी करून तडजोडअंती 8000/- रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवील्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून आज दि.20/10/2022 रोजी आयोजित करण्यात आलेले सापळा कारवाई दरम्यान आलोसे श्री अमोल गिरी यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून 4000/- रु.लाच उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय,अचलपुर, कार्यालय परिसर जि. अमरावती येथे रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.दोन्ही आरोपींताना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध परतवाडा पोलीस ठाणे, अमरावती ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदरची कार्यवाही मार्गदर्शन
▶️मा.श्री.विशाल गायकवाड,
पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक, व श्री. देविदास घेवारे, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वी.अमरावती परिक्षेत्र, अमरावती. तसेच श्री. संजय महाजन पोलीस उपअधीक्षक.ला.प्र.वी.अमरावती

यात सापळा व तपास अधिकारी मध्ये – श्री. सतिश उमरे,पोलीस निरीक्षक ला.प्र.वी.अमरावती.
कारवाई पथक मध्ये  पोनि.श्री.सतीश उमरे , पोनि.योगेशकुमार दंदे, पोना/युवराज राठोड, क्रुणाल काकडे, विनोद कुजांम,
पोशी/शैलेश कडु, चालक श्री प्रदीप बारबुद्धे यांचा समावेश होता