संपलेल्या काँग्रेससाठी काहीतरी करा म्हणून भारत जोडो यात्रा काढली

0
472

शेगाव:- उद्या शेगाव शहरामध्ये माननीय राहुल गांधी यांची सभा होत आहे यासाठी नेते जोमाने कामाला लागलेली आहे हे काम करताना त्यांना हेही भान राहिला नाही की शासनाने बाल कामगारांकडून काम करून घेऊ नये असं कायदा आहे परंतु आपले पैसे वाचवण्यासाठी लहान मुलांकडून काँग्रेस पक्षाचे झेंडे लावून घेतले खरंतर भारत जोडो मध्ये काँग्रेस पक्षाच्या झेंड्याचे काय काम? म्हणजे भारत जोडो यात्रा आहे की काँग्रेस जोडो?
नेहमीप्रमाणे काँग्रेस दिशाभूल करण्याचे प्रयत्न करीत आहे त्यासोबतच आपल्या नेत्याच्या सभेमध्ये जास्तीत जास्त संख्येने लोक गोळा व्हावी यासाठी इतर पक्षांची नेते मंडळी हजर राहतील स्टेटमेंट देऊन जनतेला अंधारात ठेवत आहे व या अफवा मोठ्या जोरात पसरवीत आहे यामध्ये अशी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी सभा होत आहे त्या ठिकाणची माहिती व सभा किती एकर मध्ये आहे यांची नेत्यांमध्ये सांगताना तफावत दिसून आली तसेही शेगाव शहरामध्ये काँग्रेस अनेक गट आहे हे येथील जनता जाणून आहे खरंच या भारत जोड आंदोलन नंतर हे गट एकत्र होतील का की फक्त लोकांना दाखवण्यापूर्ती उद्या राहतील हे पाहणे महत्त्वाचे राहील.
सभेसाठी फक्त 48000 खुर्च्या ची बसण्याची व्यवस्था दिसून येत आहे आणि हे सांगत आहे पाच लाख लोक येतील परंतु या अगोदरच आमचे न्यूज चॅनलने याची पुष्टी करत जास्तीत जास्त एक ते दोन लाख लोक या सभेमध्ये दिसून येतील याचा अर्थ यांनी सांगितलेल्या लोकसंख्येचा फुगा फुटला म्हणा?
तसेच त्यामध्ये काँग्रेस नेत्यांचा अभाव दिसून येतो माझे काम मला सांगू नको असे म्हणत आपल्याच कामाचे पितळ उघडे पडताना दिसत आहे.

आज नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेगाव येथे होणाऱ्या सभेमध्ये काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचे आदेश मनसे सैनिकांना दिली आहे म्हणजे उद्या होणाऱ्या सभेला गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु यामध्ये सामान्य जनतेची काही बरे वाईट झाले किंवा त्यांना कुठलीही इजा पोचल्यास या गोष्टीला जबाबदार कोण राहील परंतु यांना लोकांपेक्षा आपले नेत्यांची सभा महत्त्वाची वाटते आणि प्रशासन सुद्धा काही हालचाली करण्यास तयार नाही पाहूया यामध्ये गळल्या होऊन जातो जनता प्रशासन की राजनेते