20 हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी व मानधन तत्वावरील कोतवाल ACB च्या जाळ्यात

0
6712
Google search engine
Google search engine

अमरावती / धामणगाव रेल्वे :-

तक्रारदार यांनी दिनांक 21/12/2022 रोजी लेखी तक्रार दिली की, जुना धामणगाव रेल्वे येथील मंडळ अधिकारी श्री उगले हे तक्रारदार यांचे मुरूम वाहतूक ट्रॅक्टर हद्दीत चालू देने करिता कोतवाल मार्फत 30,000/- रुपयाची लाचेची मागणी करत आहेत. त्यावरून आज पडताळणी कारवाई दरम्यान अलोसे श्री. उगले यांनी कोतवाल श्री तायडे याचे मार्फतीने 30,000/- रुपये लाचेची मागणी
करून तडजोडी अंती 20,000/- स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर लागलीच आयोजित सापळा कारवाई दरम्यान यातील आलोसे श्री उगले यांनी तक्रारदार यांना लाचेची रक्कम आलोसे श्री तायडे याचे कडे देण्यास सांगितले अलोसे श्री तायडे यांनी लाच रक्कम स्वीकारून आलोसे श्री उगले यांचे जवळ दिली. नमूद दोन्ही आलोसे यांना 20,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले नमूद आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदरची कारवाई मार्गदर्शन* –
▶️मा. श्री. मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

1)श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

2)श्री. देविदास घेवारे, अप्पर पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

3) श्री संजय महाजन, पोलीस उपअधीक्षक, अमरावती घटक, अमरावती,

4) श्री शिवलाल भगत, पोलीस उपअधीक्षक, अमरावती घटक, अमरावती,

सदर कारवाई  *सापळा व तपास अधिकारी* – पो. नि. प्रवीण पाटील ,ला.प्र.वी.अमरावती अंतर्गत  *कारवाई पथक* -मध्ये
प्रविण पाटील पोलीस निरीक्षक,, केतन मांजरे पोलिस निरीक्षक, पोना-राहुल वंजारी , पोना- युवराज राठोड, पोकॉ – वैभव जायले, चालक पोउपनि सतीश किटूकले ला.प्र.वी.अमरावती.