पोलिसांकडून ४२ गोवंशाची सुटका ; मध्य प्रदेशातील २ आरोपी अटकेत

0
2291
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार / शिरजगांव :- 

अमरावती ग्रामीण जिल्ह्याचे सीमेवरील मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात कत्तली करिता गोवंशाची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने सदर अवैध वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी श्री अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण तसेच श्री शशिकांत सातव अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांचे आदेशान्वये जिल्ह्यातील महत्त्वाचे सीमा भागांवर नियमितपणे नाकाबंदी व पेट्रोलिंग करून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे .
सदर मोहिमेअंतर्गत काल रात्री पोलीस स्टेशन शिरजगाव येथील पोलीस पथक गस्तीवर असताना बहिरम येथील आरटीओ चौकीजवळ एका टाटा आयशर क्रमांक mp 13 GB 5065  सदर आयशर ट्रक संशयास्पद स्थितीत भरदा वेगाने जाताना आढळून आला सदर मानस थांबवण्याचा प्रयत्न केला असतांना थांबता वाहन पुढे निघून गेले करिता सदर वाहनाचा पाठलाग करून थांबविले व वाहनाची झेडपी घेतली असता वाहना मागच्या बाजूला लसणाची पोती होती सदर लसणाच्या पोत्याच्या मागे लाकडाचे दोन कप्पे बनविण्यात आले असून त्यामध्ये गोवंश ४२ बैल त्यांची कोणत्याही प्रकारची चारापाण्याची सोय न करता आखूड दोरीने अमानुष रित्या निर्दयतेने बांधून ठेवले असल्याचे दिसून आले.
सदर गोवंशांची लगेच सुटका करून सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर गोवश यांना गोकुळम गौशाळा नांदुरा येथे दाखल करण्यात आले आरोपी नामे संतोष भवरलाल लोधा वय 55 , युनूस अली सत्तार वय 40 दोन्ही राहणार सारंगपूर जिल्हा रायगड यांचे विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमान्वये कार्यवाही करून त्यांच्या ताब्यातून गोवंश, आयशर ट्रक,  लसूण इत्यादी असा एकूण 2466000 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई श्री अविनाश बारगळपोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण तसेच श्री शशिकांत सातव अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण व श्री अतुल नवगिरे उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपूर यांचे मार्गदर्शनात

सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रशांत गीते पोलीस उपनिरीक्षक, पो.उ. नि अमोल मानकर ,पोलीस अंमलदार मनोज पंडित ,अजय कुमरे, सागर जाधव, सतीश पुनसे ,अमोल कपले,  सागर जाधव यांचे पथकाने केली आहे