अमरावती जिल्हा ब्रेकिंग :- ऑनलाईन शॉपींगमध्ये मोबाईल ऐवजी आला डमी मोबाईल व साबन

0
587
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वेच्या ग्राहकाची कंपनीकडे तक्रार

डिलिव्हरी बॉय समक्ष पॅकींग उघडली

चांदूर रेल्वे – (ता. प्र.)

चांदूर रेल्वे शहरातील एका व्यक्तीने ऑनलाईन शॉपींगमध्ये एका कंपनीच्या ॲपव्दारे मोबाईल ऑर्डर केला असता त्यांना ओरीजनल मोबाईल ऐवजी डमी मोबाईल व साबन मिळाली आहे. यामुळे ग्राहकाने याबद्दल कंपनीकडे तक्रार केली असुन यावर संबंधितांवर कारवाई करून ओरीजनल मोबाईल देण्याची मागणी त्यांनी केली.

चांदूर रेल्वे शहरातील निलेश चंदाराणा यांनी कुटूंबातील एका सदस्याकरिता वन प्लस कंपनीचा २८ हजार ९९९ रूपये किंमतीचा २ टी ५ जी मोबाईल एका नामांकित ऑनलाईन शॉपींग ॲपव्दारे १७ जानेवारी ला बूक केला होता. सदर मोबाईलचे पार्सल मिळाल्यानंतर त्यांनी २४ जानेवारीला डिलिव्हरी बॉय समक्ष पॅकींग उघडली असता त्यामध्ये ओरीजनल वन प्लस कंपनीच्या मोबाईल ऐवजी रेडमी ९ हा डमी फोन आला. सोबत त्यात लक्स, लाईफबॉय च्या साबन आल्या. हा प्रकार बघून निलेश चंदाराना हे अचंबित झाले. यानंतर त्यांनी डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून संबंधित कंपनीकडे तक्रार केली आहे व या प्रकरणाची चौकशी करून कंपनीने दोषींवर कारवाई करावी. तसेच मला नवीन मोबाईल देण्यात यावा अशी मागणी त्यांनी कंपनीकडे केली आहे.

ऑनलाईन ऐवजी प्रत्यक्षा दुकानातून खरेदी करा

मी ॲमेझॉनव्दारे मोबाईल ऑर्डर केले असता त्यात डमी मोबाईल व साबन आले. त्यामुळे ऑनलाईन शॉपींगमध्ये होत असलेली फसवणुक पाहता ग्राहकांनी ऑनलाईन ऐवजी प्रत्यक्षात दुकानातून वस्तूंची खरेदी करावी असे आवाहन निलेश चंदाराणा यांनी केले आहे.