अमरावती जिल्हा ब्रेकिंग :- सरपंच लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ; लावणी नृत्य स्पर्धा कार्यक्रम साठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याकरीता सरपंचानी मागितली ३२ हजाराची लाच

0
3270
Google search engine
Google search engine

 

चांदुर बाजार / बहिरम :-

यातील तकारदार हे समर्थ फाऊंडेशन संस्थेचे संचालक असुन संस्थेमार्फत बहीरम यात्रेमध्ये लावणी नृत्य स्पर्धा कार्यक्रम आयोजन करण्याकरीता ग्रामपंचायत कारजा बहीरम येथील सरपंच श्री रमेश मोहोड हे नाहरकत प्रमाणपत्र देण्याकरीता लाचेची मागणी करीत असल्याची दि . ०१.०२.२०२३ रोजी तक्रार दिली सदर तक्रारीचे अनुषंगाने सरपंच श्री रमेश गणेशराव मोहोड यांची पंचासमक्ष पडताळणी केली असता सरपंच श्री रमेश मोहोड यांनी तकारदार यांना बहीरम यात्रेमध्ये लावणी नृत्य स्पर्धा आयोजन करण्याकरीता नाहरकत प्रमाणपत्र देण्याकरीता ३२,००० / रूपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले वरून लगेच सापळा कारवाई आयोजित केली असता सरपंच श्री रमेश मोहोड यांनी गुणवंत महाराज , संस्थान चे परीसरामध्ये तकारदार यांचेकडुन ३२,००० / – रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे . सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , अमरावती परीक्षेत्र , अमरावती श्री . मारुती जगताप सा . , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र . वि . अमरावती परीक्षेत्र , अमरावती श्री अरूण सांवत सा . श्री . देविदास घेवारे , घटक प्रमुख श्री संजय महाजन सा , श्री . एस . एस . भगत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अमोल कडु , श्री . योगेशकुमार दंदे , पो.स्टाफ माधुरी साबळे , विनोद कंजाम शैलेश कडु व वाहन चालक सतिष किटुकले सर्व ला.प्र . वि . अमरावती यांनी पार पाडली