अमरावती ब्रेकिंग :- एसटी व दुचाकीचा भीषण अपघात ; पाच वर्षीय चिमुकला ठार, आई-वडील गंभीर

0
3126
Google search engine
Google search engine

डवरगाव येथे संतप्त नागरिकांचा चक्काजाम ; गतिरोधक बसविण्याची मागणी

अमरावती : मोर्शीहून अमरावतीकडे येणाऱ्या एसटीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पाच वर्षीय बालक जागीच ठार झाला. तर त्याचे आईवडील दोघेही गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना डवरगाव फाट्यावर आज गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली. अन्वित पंकज वलगावकर (५, रा. अंतोरा आष्टी, जि. वर्धा) असे घटनेत ठार झालेल्या चिमुकल्याचे मुलाचे नाव आहे.

घटनेनंतर संतप्त नागरिकांनी डवरगाव येथे राष्ट्रीय महामार्ग रोखून दिड तास चक्काजाम केला. माहुली जहागीर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तातडीने जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले व संतप्त नागरिकांचा जमाव शांत केला