डॉ. हरिदास आखरे यांच्या शिवकाव्य ग्रंथाचे प्रकाशन

0
164
Google search engine
Google search engine

*डॉ. हरिदास आखरे यांच्या शिवकाव्य ग्रंथाचे प्रकाशन*

शेगाव येथील संत साहित्य व शिव चरित्राचे अभ्यासक, कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय मराठी विभागाचे प्रा. डॉ. हरिदास आखरे यांच्या शिवकाव्य ग्रंथाचे प्रकाशन मराठी साहित्यातील महान ग्रंथ ज्ञानेश्वरीचा निर्माण भूमी नेवासा येथे संपन्न झाले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे महान जीवन, दिव्य पराक्रम, कुळवाडी भूषण व बहुजन प्रतिपालक राजा या सर्व भूमिकांचे यथार्थपणे वर्णन करणारा *शिवकाव्य* ग्रंथाचे प्रकाशन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध समीक्षक श्रीपालजी सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली आ.लहुजी कानडे , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.अविनाश संगोलेकर, संत साहित्य अभ्यासक डॉ. वंदना मुरकुटे, प्रसिद्ध गीतकार बाबासाहेब सौदागर ह. भ. प. शिवाजीराव देशमुख, प्रा बाबुराव उपाध्ये ज्ञानज्योती संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत व इतर मान्यवरांच्या हस्ते शिवजयंती पर्वावर नेवासा येथे पहिल्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात संपन्न झाले. छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्याचा व पराक्रमाचा यथार्थपणे वर्णन करणारा हा काव्य ग्रंथ आहे. असा उल्लेख साहित्य संमेलन अध्यक्ष समीक्षक श्रीपालजी सबनीस यांनी आपल्या वक्तव्यातून केला. प्रस्तुत ग्रंथास सुप्रसिद्ध अभिनेते तथा खासदार अमोल कोल्हे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. प्रशांत पब्लिकेशन जळगाव यांनी हा ग्रंथ सुबक व आकर्षक स्वरूपात प्रकाशित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या भरत खंडाचे असिम चैतन्य आहेत. त्या चैतन्याला मनापासून साद घालण्याचा हा तेजोमयी काव्य प्रयत्न आहे. अशी भावना प्रकाशनानंतर आपल्या मनोगतातून शिवकवी डॉ. हरिदास आखरे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे बहारदार संचालन आकाशवाणी कलाकार प्रसन्न धुमाळ यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रा. आदिनाथ जोशी यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील अनेक साहित्यिकांची मांदियाळी व प्राध्यापकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.