आमदाराच्या नावाने २५ लाखांची लाच ; अमरावती च्या दोघांवर लाचलुचपत विभागाची कारवाई ; राजकीय वर्तुळात खळबळ

0
4637
Google search engine
Google search engine

नागपूर : महाराष्ट्र विधानपरिषदेतील आ.वजाहत मिर्झा यांच्या नावाने २५ लाखांची लाच घेताना दोघांना नागपुरात रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. विधीमंडळात प्रश्न उपस्थित न करण्यासाठी दोघांनी एका शासकीय अधिकाऱ्याला एक कोटींची लाच मागितली होती. लाच घेताना पकडण्यात आलेला एक आरोपी एमआयडीसीमध्ये तंत्रज्ञ असून दुसरा राजकीय कार्यकर्ता आहे. तक्रारदार अधिकारी ‘आरटीओ’तील असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून या कारवाईमुळे राजकीय वर्तुळातदेखील खळबळ माजली असून विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

एमआयडीसी-अमरावती येथील टेक्निशिअन दिलीप वामनराव खोडे (५०, हिरानंदानी मिडोज, ठाणे पश्चिम) व शेखर भोयर (अमरावती) या दोघांनी तक्रारदार अधिकाऱ्याला संपर्क केला. आपण आ.मिर्झा यांच्या जवळचे असून विधानपरिषदेत यापुढे हा प्रश्न उपस्थित होणार नाही व तक्रारीवर कुठलीही कारवाई न होता मुद्दा परस्पर मिटविल्या जाईल, अशी बतावणी करत दोन्ही प्रकरणांचे प्रत्येकी ५० लाख असे एकूण १ कोटी रुपये मागितले. ही रक्कम फार जास्त होत असल्याचे म्हणत अधिकाऱ्याने हात वर केले. मात्र दोन्ही आरोपींनी २५ लाख रुपयांत प्रकरण निपटविण्याची तयारी दाखविली. लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित अधिकाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

माहितीनुसार यातील तक्रारदार यांचे विरुद्ध आमदार मा. श्री.वजाहत मिर्झा , विधान परीषद म. राज्य यांचे कडे तक्रारदार यांचे विभागातील महिला अधीकारी यांनी केलेल्या तक्रारीमध्ये विधानपरिषद म.राज्य मध्ये प्रश्न उपस्थित न करणे व तक्रारीवर कोणतीही कारवाई न होता परस्पर मिटविण्याकरिता दिनांक 28/03/2023 आरोपी यांनी दोन केसेस चे प्रत्येकी 50,00,000/- असे ऐकून 1 कोटी रुपयांची मागणी केली. दिनांक 28/03/2023 रोजी आलोसे यांनी तक्रारदारास तडजोडी अंती 25,00,000/- रु.ची लाच रक्कम मागणी करून आरोपी क्र.१ यांनी पंचासमक्ष स्वीकारल्याने रंगेहात पकडण्यात आले. आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

 

पोलीस निरीक्षक सचिन मते, निलेश उरकुडे, प्रीती शेंडे, सुशील यादव, हरीश गांजरे, बादल मांढरे, सूरज भोंगाडे, विनोद नायगमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.