अमरावती जिल्हा ब्रेकिंग :- स्‍वभिमानी शेतकरी संघटनेचे दोन पदाधिकारी डिटेन ; उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापुर्वी पोलीस प्रशासनाने घेतली खबरदारी

0
2637
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे :-

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोमवारी सकाळी १० वाजता अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापुर्वी चांदूर रेल्वे येथील स्‍वभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिरभाते व शहराध्यक्ष दिनेश आमले यांना चांदूर रेल्वे पोलीसांनी सकाळी ७ वाजताच घरून डिटेन केले. यापुर्वी ५ मार्चला उपमुख्यमंत्री फडणवीस अमरावती दौऱ्यावर आले असता स्‍वभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ताफ्यासमोर निदर्शने तथा कांदे फेकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलीसांनी तो हाणून पाडला होता. त्यामुळे या दौऱ्यापुर्वी खबरदारी म्हणून आधीच या दोन्ही पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी डिटेन केले आहे.