अमरावती जिल्हा ब्रेकिंग :- महिला सरपंचासह एकाला लाच घेताना अटक ; दहा हजाराची मागितली लाच

0
7995
Google search engine
Google search engine

अमरावती :-

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जामगावच्या सरपंचा बबीता संजय खानंदे (43) आणि गावचे सदस्य पंकज हरिदास तळण (33) यांना जामगाव फाटा परिसरात माऊली चोर एकूण दहा हजार रुपयांची लाज घेताना रंगेहाथ पकडले.

तक्रारदार ठेकेदाराने  २०२२ मध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जामगाव गावातील जलजीवन मिशन अंतर्गत पाईप लाईन टाकली होती हे काम ग्रामपंचायत  कडे हस्तांतरित करण्याचा करारावर स्वाक्षरी करण्यासाठी आरोपींनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती ,  दोन्ही आरोपींना लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे

एसीबीचे अधीक्षक  मारुती जगताप , एएसपी अरुण सावंत,  देविदास घेवारे,  डीएसपी संजय महाजन , शिवलाल भगत ,  यांचा मार्गदर्शनाखाली

पीएआय सतीश उमरे , योगेशकुमार दंदे व त्यांचा टीमने ही कारवाई केली आहे