कडेगाव शहरात दिमाखदार ३५० वा हिंदू साम्राज्य दिवस समारोह सोहळा साजरा :

Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव न्युज:


कडेगांव येथे छत्रपती संभाजी महाराज चौकात शुक्रवार दिनांक2 जून रोजी अर्थात जेष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिव राज्य अभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिवस समारोह सोहळा सर्वपक्षीय नेते, सरकारी अधिकारी व असंख्य शिवप्रेमी नागरिक व समस्त हिंदू समाज यांच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी वेदोक्त अभिषेक नंतर दुपारी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित प्रतिमेचे कडेगाव पलुस तालुका प्रांत अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी अजय शिंदे , प्रभारी तहसीलदार श्री विलास भिसे, नायब तहसीलदार सागर कुलकर्णी, कराड जिल्हा संघचालक डॉ मकरंद बर्वे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड भाऊ, उपनगराध्यक्ष विजय गायकवाड, युवा नेते बापुराव देशमुख, श्री प्रविण कदम सर, प्रा. दीपक कुलकर्णी , नगरसेवक युवराज राजपूत, शिवसैनिक मुकुंद कुलकर्णी, वैभव डवरी, उद्योजक प्रविण भोसले,संभाजी देसाई, प्रदीप पुजारी, नवनाथ चन्ने, कडेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोपळे साहेब, कोतवडे माजी सरपंच संभाजी यादव व अनेक शिवप्रेमी नागरिक यांच्या उपस्थितीत पूजन करून अभिवादन करण्यात आले.. यानंतर सांगली जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री शरद भाऊ लाड यांनी भेट घेऊन छत्रपती. शिवाजी महाराजांना अभिवादन केले यावेळी त्यांच्याबरोबर कडेगाव पलूस मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष . डी. एस देशमुख बापू, नगरसेवक संदीप काटकर, अतुल नांगरे, संतोष कुलकर्णी , वैभव देसाई, सागर लाटोरे, दीपक न्यायनित यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दुपारच्या सत्रात जेष्ठ नेते व सांगली सातारा विधानपरिषद आमदार श्री मोहन राव कदम दादा यांनी कार्यक्रम स्थळी भेट घेऊन श्री महाराजांना अभिवादन केले यावेळी त्यांच्याबरोबर कडेगाव चे माजी उपनगराध्यक्ष सागर सुर्यवंशी आणि युवा नेते आकाश धर्में, विठ्ठल खाडे, श्री विक्रम शिंदे, उपस्थित होते.. दिवसभरात अनेक नागरिकांनी महाराजांचे दर्शन घेवून अभिवादन केले. सकल हिंदु समाज यांच्या वतीने आज पासून सुरू होणाऱ्या व वर्षभर चालणाऱ्या या 350 व्या शिव राज्य अभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिवस समारोह सोहळा शुभारंभ कार्यक्रमाचे श्री ज्ञानेश्वर शिंदे साहेब, अमोल जाधव, बालाजी विभुते व अनेक शिव प्रेमी कार्यकर्ते यांनी आयोजन केले होते. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्य अभिषेक मागील राजकिय, धार्मिक, सामाजिक, परराष्ट्र धोरण विषयी भूमिका तसेच महाराजांना अपेक्षित रयतेचे लोककल्याणकारी राज्य व शिव राज्य अभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिन म्हणजे काय ते सर्व समाजाला कळावे यासाठी कडेगाव तालुक्यातील 55 गावातून व्याख्यान, तरुणांची बाईक रॅली, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, पर्यावरण संवर्धन अभियान यासह महाराजांच्या कार्याची माहिती देणारे घरोघरी पत्रक वाटप व संपर्क अभियान या समितीच्या वतीने वर्षभर सतत करण्याचे नियोजन असल्याचे आयोजक यांनी सागितले.