कडेगांव येथे मोफत नेत्र व मधुमेह तपासणी शिबीरास मोठा प्रतिसाद

Google search engine
Google search engine

सांगली कडेगाव न्युज:

सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल व किरण मेडिकल शॉपी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबीर व मधुमेह तपासणी शिबीर दिनांक 6 व 7 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत आहे.
शिबिराचे उद्घाटन तहसिलदार अजित शेलार यांच्या हस्ते झाले. यावेळी कर्तव्यदक्ष तहसिलदार अजित शेलार व पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी ऐस देशमुख यांचा सत्कार किरण मेडिकल शॉपी व सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल तर्फे करण्यात आला. अनेक गरजू डोळ्यांचा त्रास उद्भवणाऱ्या रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. अनेक रुग्णांचे मोतीबिंदू निदान झाले. यावेळी बोलताना डॉ प्रमोद गोडसे-पाटील म्हणाले की मोतीबिंदू तपासणी, केशरी व पिवळे रेशनकार्ड धारकांना शासकीय योजनेतून बसणार्‍या सर्व नेत्रशस्त्रक्रिया, शासकीय योजनेतून मोफत केल्या जाणार आहेत. यावेळी किरण मेडिकल शॉपी तर्फे मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी गरजू नागरिकांची करण्यात आली, यावेळी बोलताना किरण मेडिकल शॉपी चे प्रो. अभिमन्यू वरूडे म्हणाले की नागरिकांचे डोळे व आरोग्य चांगले रहावे यासाठी आम्ही हा मोफत तपासणी शिबीर हा सामाजिक उपक्रम सुरू ठेवत आहे. यावेळी पाणी संघर्ष समितीचे सामाजिक कार्यकर्ते, जीवन करकटे, राजेंद्र राऊत, प्रविण करडे, वसंत इनामदार, व ईतर मान्यवर उपस्थित होते.
पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी ऐस देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.