महावितरण विरोधी आंदोलनाला यश*

Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव न्युज:

महावितरण विरोधी आंदोलनाला यश
कडेगाव सर्व पक्षीय पाणी संघर्ष समिती व शेतकर्‍यांतर्फे कडेगाव महावितरण कार्यालयावर विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी ऐस देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व कडेगाव नगरपंचायत विरोधी पक्षनेते विजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आला होता.
यानंतर महावितरणने कडेगाव शहर व तालुक्यातील काही कामे तातडीने मार्गी लावली आहेत तर काही कामासंदर्भात ऐक महिन्याची मुदत मागितली आहे. महावितरणने वरील राहिलेले काही प्रश्न तत्परतेने सोडविण्यासाठी तसेच 9-6-2023 रोजी होणारे महावितरण विरोधात आंदोलन करू नये यासाठी महावितरण अधिकारी यांनी दिनांक 8:6:2023 रोजी चर्चेला बोलविले होते. चर्चेसाठी पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी ऐस देशमुख, संयोजक अभिमन्यू वरूडे, संतोष डांगे , जगदीश महाडिक, रघुनाथ गायकवाड, दिपक न्यायनीत, जयवंत देशमुख, प्रकाश गायकवाड उपस्थित होते.
पाणी संघर्ष समितीचे सामाजिक कार्यकर्ते यांना आंदोलन करू नये, काही मागण्या पूर्ण केल्या आहेत व काही मागण्या बाबतीत
कामे सुरू आहेत त्याबाबत चे लेखी आश्वासन महावितरण ने दिले व त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आश्वासनमध्ये कडेगाव शहरासह तालुक्यातील नव्वद डी- पी दुरुस्ती केले आहेत ,जुने पोल तारा, फ्यूज दुरुस्ती कामे सुरू आहेत.
शेतीसाठी तात्काळ वीज कनेक्शन मिळणार आहे . कर्मचारी वेळेवर व मुक्कामी हजर राहणार आहेत , सतत खंडित होणारी वीज आता दुरुस्ती कामे झाल्यामुळे लाईट खंडित होणार नाही. लाईट जात नाही आणि त्यामुळे शेतीसाठी पाणी सोडण्यास
लाईट मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे. मा. नगरसेवक नितीन शिंदे, शशिकांत रासकर व ईतर शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. शेती व घरगुती वीज दरवाढ मागे घेण्याबाबत शासनाकडे महावितरणकडे प्रस्ताव पाठविला आहे.