राज्यातील ओबीसींच्या सर्व संघटना एकत्र आणणार: प्रदेशाध्यक्ष मधुकर जंगम. 

Google search engine
Google search engine

 

सांगली न्युज:

 

महाराष्ट्र राज्यातील ओबीसींच्या सर्व 17 संघटना मुंबईत एकत्र आणणार आहे. अशी माहिती कडेगाव येथील विश्राम गृहात अखिल भारतीय ओबीसी संघटनेचे प्रदेशअध्यक्ष मधुकर जंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील ओबीसींची पतसंस्था, ओबीसीसाठी मोठा प्रोजेक्ट,प्रत्येक जिल्ह्य़ात ओबीसी-बीसी याना प्रगत समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी किमान 6 साखर कारखाने,ओबीसी जणगणना, केंद्रात ओबीसी मंत्रालय,ओबीसीना पदोन्नतीत आरक्षण,क्रिमीलेयरची अट रद्द करणे,ओबीसीना50लाख कर्ज,भूमिहीन ओबीसीना जमीन आदी मागण्यांबाबत पाठपुरावा करणार आहे.
केंद्र व राज्य सरकारने यापूर्वी मंजूर कलेल्या मागण्या याप्रमाणे:-
ओबीसीना देशात पेट्रोल पंप राखीव केले,1ली ते 12 वीच्या मुलाना स्काॅलर शीप चालू केली,MBBSला पूर्ववत 27% जागा राखीव केल्या,राज्यात ओबीसी मंत्रालय मिळविले,क्रिमी लेयर मर्यादा 5लाखावरुन 8लाख केली.अशी माहिती जंगम यानी दिली.