अमरावती जिल्हा ब्रेकिंग :- पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलेल्या दोघांचा मृत्यू – तर चांदुर बाजार तालुक्यात एक जण नाल्याच्या पाण्यात वाहून गेला

0
5474
Google search engine
Google search engine

अमरावती :-

जिल्हा अमरावती धामणगाव रेल्वे तालुक्यातील मौजा जळका पटाचे येथील स्थानिक नाल्याला पूर आल्याने एक शेतकरी श्री उमेश मारोती मोडक वय अंदाजे 32 वर्ष रा. जळका पटाचे ही व्यक्ती नाल्यात पडून पुरात वाहून गेल्याने मयत झाली आहे. सदरील घटना दुपारी २.३० वाजता सूमारास घडली

 

जिल्हा अमरावती तालुका मोर्शी


मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवर मध्य प्रदेशात असलेल्या सालबर्डी या देवस्थानात पूजेसाठी आलेली मध्य प्रदेशाची एक महिला माळू नदीत पडून वाहत मोर्शी तालुक्यात आढळून आली आहे. सदर मृतक महिलेचे नाव लक्ष्मी बाळू उबणारे वय ४० राहणार सालबर्डी असे आहे 

 

*तालुका.. चांदुरबाजार*
*मंडळ… चांदुरबाजार*

*घटना… आज दुपारी चार वाजता पूर्वेश नामदेव पारिसे, वय 20वर्ष राहणार जमापूर ….शिरजगाव बंड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला लागून असलेल्या नाल्यामध्ये वाहून गेला. शोधमोहीम चालू आहे