अमरावती ब्रेकिंग :- आधी पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या, मग स्वतःला संपवले

0
9139
Google search engine
Google search engine

पुणे : एक मोठी बातमी समोर आली आहे. अमरावती पोलीस दलातील राजपेठ विभाग सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

भरत शेखा गायकवाड (वय 57) असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. तर पत्नी मोनि गायकवाड (४४) आणि पुतण्या दीपक गायकवाड (३५) यांची हत्या झाली आहे.

अमरावती पोलीस दलातील राजपेठ विभाग सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. गेल्या शनिवारी सुट्टीवर आले होते. मध्यरात्री सव्वा तिनच्या सुमारास त्यांनी गोळी झाडून हत्या आणि त्यानंतर आत्महत्या केली. त्यांनी परवाना असलेल्या त्यांच्या खासगी पिस्तूलातून गोळ्या झाडल्या आहेत.