कराड – विटा महामार्गा मधील प्रश्न सोडवा*. *डी एस देशमुख* 

Google search engine
Google search engine

*कराड – विटा महामार्गा मधील प्रश्न सोडवा*.

*डी एस देशमुख*

कडेगाव प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांनी येत्या 25 जुलै रोजी, श्री डी एस देशमुख पलूस कडेगाव विधानसभा राष्ट्रवादी कांग्रेस व पाणी संघर्ष समिती चे अध्यक्ष आणि मान्यवर व महामार्ग संबंधित अधिकारी यांची संयुक्त बैठक कडेगाव येथे ठेवली आहे. कडेगाव ते ओगले वाडी महामार्गा मधील जाचक स्पिड ब्रेकर, महामार्ग कडेला झाडे लावणे, सुरली घाट रस्त्याचे चौपदरीकरण , कडेगाव स्टँड चौकात हायमास्ट लैम्प लावणे, प्रश्न सोडविण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. त्या अनुषंगाने  कराड- विटा महामार्गाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता कोल्हापूर चे प्रकाश शेडेकर कडेगाव येथे आले असता भेटी अंती महामार्गा मधील प्रश्न विचारून घेतले. प्रकाश शेडेकर साहेब म्हणाले की प्रांताधिकारी यांच्या बैठकीत महामार्गा चे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ. यावेळी पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरूडे, संतोष डांगे, आनंदराव रासकर उपस्थित होते.